नगरसेविका रेश्मा बापु कातळे यांच्या वाढदिवसानिमित्त १० वी १२ वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव.

चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड रावेत दि :- शिक्षण हे प्रगतीचे मंत्र शिक्षणामध्ये जे गुणवान विद्यार्थी विद्यार्थिनी आहे त्यांना प्रोत्साहन देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रभाग क्रमांक १६चे नगरसेविका रेश्मा बापु कातळे यांनी आपल्या वाढदिवसाच्या औपचारिकता साधुन वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळात प्रभाग क्रमांक १८ रावेत, किवळे, विकासनगर मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी नगरसेविका रेश्मा बापू (आण्णा) कातळे यांच्या पुढाकारातून विशेष गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संकल्प सोशल फाउंडेशन व नगरसेविका रेश्मा बापु कातळे यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नगरसेविका रेश्मा बापू कातळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक १८ (रावेत, किवळे, विकासनगर) येथील दहावी व बारावीच्या परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना या सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. गौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.तरी नगरसेविका रेश्मा वहिनी बापू कातळे यांचे जनसंपर्क कार्यालय, संगीता अपार्टमेंट समोर विकास नगर येथे नोंदणी करून आवश्यक ती कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन करण्यात आले आहे. या गुणगौरव सोहळ्याकरिता ५०% मार्क असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असल्याचे देखील सांगण्यात आले आहे तर अधिक माहितीसाठी 9170230303 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.






























