विशेष वृत्त : NAAC समितीच्या नवीन कारवाईमुळे शैक्षणिक संस्थांची वाढली धाकधूक…


विशेष वृत्त : NAAC समितीच्या नवीन कारवाईमुळे शैक्षणिक संस्थांची वाढली धाकधूक…

प्रेस मीडिया लाईव्ह

हरियाणा मधील महर्षी दयानंद विद्यापीठ या राज्य सरकारी विद्यापीठावर NAAC समितीने नुकतीच कारवाई केली आहे. या विद्यापीठाने विहित मुदतीमध्ये NAAC मूल्यांकन करून घेतले नसल्याने त्यांना यापूर्वीच्या NAAC ग्रेडचा उल्लेख त्यांच्या वेबसाईट अथवा इतर कोणत्याही कागदपत्रावर करू नये असा आदेश दिला आहे.

या विद्यापीठाच्या NAAC प्रमाणपत्राची मुदत वर्ष 2019 ते 2024 (पाच वर्षे) कालावधी होती. वर्ष 2024 नंतर या विद्यापीठाने दोन ग्रॅज्युएट बॅचेसच्या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या. मूल्यांकन केलेले नसल्याने ही बाब गंभीर असल्याचे NAAC समितीने विद्यापीठास कळविले. विद्यापीठ अनुदान आयोग व NAAC, DEC नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या विद्यापीठाच्या अंतर्गत जवळपास १०० महाविद्यालये आहेत. ही बाब विद्यार्थी, पालक, समाज व भागधारक यांची दिशाभूल करणारी आहे, असे म्हटले आहे. याची दखल घेऊन हरियाणा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. दुष्यंत चौताला व राज्यसभा सदस्य श्री. दिपेंद्र सिंग हुडा यांच्या शिष्टमंडळाने कुलपती तथा राज्यपाल यांची भेट घेऊन या विद्यापीठाच्या कुलगुरू व संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात विनंती केली आहे. शासनाने या संदर्भात कारवाई न केल्यास आम्ही याबाबत कायदेशीर मार्गाने कारवाई करू असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे राज्याच्या उच्च शिक्षण व्यवस्थेला जबरी फटका बसला आहे असे त्यांनी निदर्शनास आणले आहे. यामुळे आता विहित मुदतीमध्ये नॅक मूल्यांकन न करणाऱ्या शैक्षणिक संस्था व विद्यापीठे यांना प्रश्न उपस्थित झाला आहे. जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील रँकिंगची घसरण झालेल्या शैक्षणिक संस्था स्वतःला सावरत असतानाच व नुकतेच परदेशी विद्यापीठांनी भारतामध्ये शैक्षणिक संस्था व विद्यापीठे स्थापन करण्यासाठी उचललेले पाऊल लक्षात घेता शैक्षणिक संस्थांपुढे हा नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!