मोदी सरकारच्या धोरणांविरोधात देहुरोड मध्ये काँग्रेसचा एल्गार ; गॅस दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ काढला मोर्चा


मोदी सरकारच्या धोरणांविरोधात देहुरोड मध्ये काँग्रेसचा एल्गार ; गॅस दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ काढला मोर्चा

देहुरोड (प्रतिनिधी):

वाढती महागाई, गॅस सिलिंडरची दरवाढ, बेरोजगारी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यांमुळे सर्वसामान्य जनता होरपळत असल्याचा आरोप करत, देहुरोड शहर ब्लॉक काँग्रेस, युवक काँग्रेस आणि मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत तलाठी कार्यालयावर धडक दिली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

सवाना उपहारगृह ते तलाठी कार्यालय; परिसर घोषणांनी दणाणला

देहुरोड शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक हाजी मलंग मारीमुतू यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११:३० वाजता सवाना उपहारगृह येथून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली. हातात फलक आणि बॅनर घेऊन कार्यकर्त्यांनी ‘मोदी है तो मंहगाई है’, ‘गॅस सिलिंडर स्वस्त करा’, ‘मोदी सरकार हाय हाय’, आणि ‘नरेंद्र सरेंडर, नरेंद्र सरेंडर’ अशा घोषणा देत अबुबकर रोड, पारशी चाळ आणि वृंदावन चौक परिसर दणाणून सोडला.

महिलांचा संताप: ‘घरचे बजेट कोलमडले’

मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी महिला नेत्यांनी केंद्र सरकारवर जहरी टीका केली. “काँग्रेस सरकारच्या काळात ४०० रुपयांना मिळणारे सिलिंडर आज ९०० रुपयांच्या पार गेले आहे. त्यातच कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा ६० रुपयांची वाढ केल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सरकारने तात्काळ सिलिंडर ५०० रुपयांत उपलब्ध करून द्यावे,” अशी मागणी महिला कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

नेत्यांचा केंद्र सरकारवर निशाणा

मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहळ, तळेगाव शहर अध्यक्ष विशाल वाळुंज आणि माऊली काळोखे यांनी यावेळी मोदी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “आज देशात गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून लोक पहाटेपासून उपाशीपोटी रांगेत उभे आहेत. छोटे व्यावसायिक, खानावळ मालक अडचणीत आले असून केंद्र सरकार सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम करत आहे.”

यांची होती उपस्थिती

या आंदोलनात मावळ तालुका काँग्रेस अध्यक्ष यशवंत मोहळ, तळेगाव शहर अध्यक्ष विशाल वाळुंज, सरचिटणीस किरण मोकाशी, जिल्हा परिषद सदस्य माऊली काळोखे, सरपंच अनंत मोहळ, मोहन राऊत, चंद्रशेखर मारीमुत्तू, गफूर भाई शेख, व्यंकटेश कोळी, बबन टोम्पे, युवक अध्यक्ष मलिक शेख, रईस शेख, आकाश रामणारायण, भारतराज मारीमुत्तू, राणीताई पांडियान, दीपा जंगले, तावमनी अम्मावसी, गणेश म्हसूडगे, हितेश चहर, निलेश बोडके, हसन शेख, जुनेद शेख, देवेंद्र मारीमुत्तू, आदित्य साकम यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!