मृत्यूच्या सापळ्यातून इचलकरंजीची सुटका ; उमाकांत दाभोळेंचा पाठपुरावा आणि प्रशासनाचा ‘शॉर्ट सर्किट’ कारभार सुधारायला सुरुवात !


मृत्यूच्या सापळ्यातून इचलकरंजीची सुटका ; उमाकांत दाभोळेंचा पाठपुरावा आणि प्रशासनाचा ‘शॉर्ट सर्किट’ कारभार सुधारायला सुरुवात!

इचलकरंजीच्या रस्त्या-रस्त्यावर उभे असलेले ते गंजलेले विद्युत खांब म्हणजे जणू यमराजाचे ‘एजंट’च होते! कुणी चुकून हात लावला की सरळ वैकुंठाची वारी, अशी भयंकर अवस्था शहरात निर्माण झाली होती. पण शेवटी भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी प्रशासनाचा ‘करंट’ काढला आणि महापालिकेच्या कुंभकर्णी झोपेला चूड लागली. उशिरा का होईना, पण आयुक्त पल्लवी पाटील यांच्या तत्परतेमुळे आता या ‘डेथ ट्रॅप’ बनलेल्या पेट्या बदलण्याचे काम सुरू झाले असून दाभोळ्यांच्या जिद्दीला अखेर यश मिळाले आहे, असे ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ च्या पाहणीत समोर आले आहे.

प्रशासनाचा ‘आंधळा’ कारभार!

गेल्या कित्येक दिवसांपासून इचलकरंजीत अजब तमाशा सुरू होता. जिथं उजेड हवा तिथं काळोख, आणि जिथं गरज नाही तिथं सूर्य डोक्यावर असतानाही स्ट्रीटलाईट उजळत होते. गंजलेल्या पेट्या, लोंबकळणाऱ्या उघड्या तारा पाहून नागरिक जीव मुठीत धरून चालत होते. पण प्रशासनाला याचं ना सोयर ना सुतक! या गंभीर समस्येकडे ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ सह स्थानिक प्रसारमाध्यमांनीही चोख ‘वार्तांकन’ करून प्रशासनाचे वाभाडे काढले, ज्यामुळे हा विषय ऐरणीवर आला.

दाभोळ्यांचा ‘प्रहार’ आणि माध्यमांची साथ!

उमाकांत दाभोळे यांनी केवळ निवेदन देऊन कागदी घोडे नाचवले नाहीत, तर त्यांनी आयुक्तांना थेट इशाराच दिला की, “जर एखादी दुर्घटना घडली तर त्याचे पाप कुणाच्या माथी?” त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले. दाभोळ्यांनी या कामात ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ व इतर माध्यमांच्या जागरूकतेचेही मोठ्या मनाने आभार मानले आहेत.

दहा लाखांचा ‘इलाज’!

सुमारे दहा लाख रुपयांच्या इस्टिमेटमधून आता या गंजलेल्या यंत्रणेवर उपचार सुरू झाले आहेत. मात्र, अत्रे स्टाईलमध्ये सांगायचे तर—”बाबांनो, फक्त पेट्या बदलून नकाशा उजळवू नका, तर ती व्यवस्था टिकवून ठेवा!” दाभोळ्यांनी मागणी केल्याप्रमाणे, आता प्रत्येक खांबाची नियमित तपासणी करण्यासाठी एक स्वतंत्र ‘पथक’ नेमलंच पाहिजे.

उमाकांत दाभोळे यांच्या पाठपुराव्यामुळे इचलकरंजीच्या जनतेचा जीव भांड्यात पडला आहे. आता किमान रस्त्यावर चालताना कुणाला ‘शॉक’ लागणार नाही, इतकीच माफक अपेक्षा ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ व्यक्त करत आहे.

 

 


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!