पुष्पहार अर्पण करून प्रत्येक कार्यकर्त्याचा केला जंगी सत्कार ; खान साहेबांच्या निवासस्थानी पाहुणचाराचा थाट !

पुणे: नुकतीच हंगामी उपाध्यक्ष पदी निवड झाल्याच्या निमित्ताने लुकमान खान साहेब यांच्या निवासस्थानी ‘इफ्तार’ आणि ‘मगरीब’च्या नमाजनंतर भव्य स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे खान साहेबांनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी दाखवलेली कमालीची नम्रता आणि केलेला विशेष सन्मान.
आदरातिथ्य अन् माणुसकीचा दर्शन सोहळा
पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून आयोजित या स्नेहमेळाव्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. इफ्तारचा विधी पार पडल्यानंतर लुकमान खान साहेबांनी स्वतः प्रत्येक पाहुण्याकडे जाऊन अत्यंत आदराने त्यांची ‘गुलपोशी’ (पुष्पहार अर्पण) केली. नवनियुक्त पदाचा आनंद साजरा करताना आपल्या सहकाऱ्यांना आणि जनतेला दिलेला हा सन्मान उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरला.
स्नेहभोजनाचा आस्वाद
सायंकाळच्या नमाजनंतर सर्व उपस्थितांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपस्थित जनसमुदायाने खान साहेबांना त्यांच्या नूतन निवडीबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या.
“हा केवळ माझा सत्कार नसून हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे. सर्वांच्या उपस्थितीने या आनंदाला खऱ्या अर्थाने उधाण आले आहे,” अशा शब्दांत खान साहेबांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.
या सोहळ्याला स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खान साहेबांच्या या विनम्र स्वभावाचे आणि नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





























