वसंत दादा रक्त केंद्रा तर्फे डॉ मयुरी फडके यांचा सत्कार
सांगली जिल्हा प्रतिनिधी : अशोक मासाळ

मिरज: येथील वसंत दादा पाटील रक्त केंद्र व हिमाटोलॉजी रक्त संशोधन केंद्र यांच्यावतीने रक्त संक्रमण अधिकारी डॉ.वैशाली पोळ यांच्या हस्ते ओरल पॅथॉलॉजी या पॅथॉलॉजी च्या सुपर स्पेशालिटी शाखेमध्ये पदव्युत्तर परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल डॉक्टर मयुरी मीनाक्षी रवींद्र फडके हिचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यक्त केंद्राचे पदाधिकारी कर्मचारी व सीएनसी डिप्लोमा कॉलेज प्राचार्य राम हुंनुरगे व रक्तदाते उपस्थित होते. डॉक्टर वैशाली पोळ म्हणाले की हेड अँड नेक या भागातील विशेषतः तोंडाचा कॅन्सर या मध्ये पदव्युत्तर विभागात डॉ. मयुरी यांचा विशेष अभ्यास आहे. भविष्यात या क्षेत्रात संशोधन पेपर पब्लिकेशन करण्याचा मानस असल्याचे डॉ मयुरी हिने सांगितले.
Views: 278































