पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी: दैनिक ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे असीम शेख काळाच्या पडद्याआड


पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी: दैनिक ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे असीम शेख काळाच्या पडद्याआड

पुणे: दैनिक ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे ज्येष्ठ पत्रकार श्री. असीम शेख यांचे आज, ५ जानेवारी २०२५ रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुणे शहरातील पत्रकारिता क्षेत्रातील एक अभ्यासू, प्रामाणिक आणि संवेदनशील आवाज कायमचा शांत झाला असून संपूर्ण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

अंत्यविधीची माहिती: स्व. असीम शेख यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ०४:४५ वाजता कॅम्प येथील तंडेल मस्जिद येथे नमाज-ए-जनाजा अदा करण्यात येईल. त्यानंतर जवळच असलेल्या साचापीर मुस्लिम कब्रस्तान येथे त्यांच्या पार्थिवावर दफनविधी पार पडणार आहे.

असीम शेख यांनी आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर लिखाण केले होते. त्यांच्या निधनाबद्दल पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना आणि आप्तेष्टांना हे मोठे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना.

अंजुम इनामदार ९०२८४०२८१४

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!