नटसम्राटाची महाएक्झिट: नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; अभिनय आणि माणुसकीचा वादळी अध्याय शांत!
सुनिल पाटील :
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या अंगावरच्या अफाट अभिनयाने हादरवून सोडणारे, संवादाच्या प्रत्येक श्वासावर रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ७५ व्या वर्षी अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने कलासृष्टी आणि सामाजिक क्षेत्रावर एक शांत, निःशब्द करणारी शोककळा पसरली आहे.
पडद्यावरचा तो रुबाबदार, कडाडणाऱ्या विजेसारखा आक्रमक चेहरा आणि दुसरीकडे ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त बळीराजाचे अश्रू पुसणारा अत्यंत हळवा, संवेदनशील माणुसकीचा झरा… या दोन्ही रूपांचा मेळ म्हणजे नाना पाटेकर.
नानांनी प्रेक्षकांना हसवले, रडवले आणि विचार करायला लावले. त्यांच्या अभिनयात जी एक विलक्षण जिद्द आणि निष्ठा होती, ती आजच्या काळात दुर्मिळच. रंगभूमीवरून सुरू झालेला हा प्रवास चित्रपटसृष्टीच्या माथ्यावरचा मुकुटमणी ठरला. परंतु काळाचा महिमा अगाध आहे. ज्या माणसाने आयुष्यभर संवादाच्या जोरावर लक्षावधी माणसांच्या हृदयावर राज्य केले, त्याच हृदयाने आज अचानक साथ सोडली.
एका महान कलावंताची आणि तितक्याच मोठ्या मनाच्या निष्ठावंत माणसाची ही अचानक झालेली गळती मनाला खोलवर चटका लावून जाणारी आहे. नटसम्राटाचा हा पडदा आज असा काही कायमचा पडला आहे की, ती पोकळी वर्षानुवर्षे जाणवत राहील.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!






























