आमदार सुनील शेळके यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप मावळ तालुक्याच्या वतीने भाजपाचा निषेध मोर्चा.


माजी मंत्री भेगडे:- आपण या तालुक्याचे पालक आहेत मालक नाही, जर नीधीचा पैसा कसे खर्च करावा त्यासाठी आमच्या कडे क्लासला या

चंद्रशेखर पात्रे :

“कार्यकर्त्यांच्या सन्मानात भाजपा मैदानात” असे जोरदार घोषणांनी परिसर संपूर्ण परिसर दणाणून सोडत, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप कार्यकर्ता बाबत आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याचा निषेधार्थ भाजप मावळ तालुक्याच्या वतीने गुरुवार दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी वडगाव मावळ येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.

मोर्चा सुरुवात होण्यापूर्वी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या निधन झाल्याने तसेच दिवे आगार दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रथम श्रद्धांजली देण्यात आला तदनंतर हा मोर्चा पोटोबा देवस्थान महाराज मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, गणेश भेगडे, उपसभापती शांताराम कदम, गुलाब काका मासाळकर, रणजीत काकडे आदींनी केले. यावेळी भाजप पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की पक्ष हा निष्ठावान कार्यकर्त्यांचा मेहनतीने उभा आहे सत्ता आमची असुन असा कार्यकर्त्यांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार आमदारांनी हरोमखोर निर्लज्ज असे चुकीचे शब्द वापरले आहेत कार्यकर्त्यांच्या सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी हा निषेध मोर्चा काढण्यात आला आहे, या प्रकरणी तीन दिवसापूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली चे माहिती यावेळी देण्यात आली.

तुम्ही या तालुक्याचे पालक आहेत मालक नाही:- माजी मंत्री भेगडे यावेळी माजी राज्यमंत्री यांनी आमदार सुनील शेळके यांचा खरपूस समाचार घेत म्हणाले खऱ्या अर्थाने तालुकेच्या प्रतिनिधी म्हणून आमदाराने कसे वागावे हे त्यांना कळत नाही खरं तर मावळचे हे दुर्दैव आहे आम्हाला मावळ तालुक्यात असे आमदार लाभले आहे “आपण तालुक्याचे पालक आहेत मालक नाही” असे जोरदार टोळा यावेळी माजी मंत्री भेगडे यांनी लावला महत्वाचे गोष्ट पोटोबा देवस्थान हे स्वास्थ संस्था आहे संस्थेवर वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांचा ठराव झाला आहे त्यात भाजपाचा काय दोष वडगांव बार असोसिएशनचा बाबत वास्तुच्या बाबत बार असोसिएशनला जिल्हा न्यायाधीशांचे पत्र आले आहे त्यात नमुद आहे जागा पसंद नाही यात भाजपाचा काय दोष तसेच देहूरोड कॅन्टोन्मेट बोर्ड च्या बाबत एक याचिका दाखल झाली कुठला नीधी किती व कुठे खर्च करावा याबाबत न्यायालयाने जिल्हाधिकारी यांना देखील ताशेरे ओढले आहेत नीधी कुठे खर्च कसे करायचे हे समजत नसेल तर आमच्या कडे क्लासला या आम्ही तुम्हाला शिकवतो असे ही टोमणा मारले आमच्या छायाछ्त्रात राहायचे आमचं जीवावर निवडुन यायाच आणी आमच्या कार्यकर्त्याचा अपमान हे आम्ही कदापि सहन करणार नाही येत्या आठ दिवसांत आमदारांनी माफी मागावी किंवा दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा मावळात तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही आणी मावळात शिरू देणार नाही असे जोरदार निषेध माजी मंत्री भेगडे यांनी व्यक्त केला. यावेळी रणजीत काकडे यांनी आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत विकास कामातील किती टक्केवारी एमआयडीसी रिंग रोड फोटो बाबा महाराज मंदिराचे आरक्षण तसेच शैक्षणिक संस्था संबंधित वेद मुद्दे उपस्थित केले तसेच त्यांनी आमदार शेळके यांना विविध प्रश्न विचारत त्यांच्या कतीत गैरव्यवहाराच्या स्पष्टीकरण देण्याची मागणी केली . देहूरोड शहराध्यक्ष रघुवीर शेलार यांनी निषेध मोर्चात आमदारांना सवाल विचारला आज ज्या प्रकारे मावळमध्ये अवैध धंदे चालू आहे तसेच वेश्या व्यवसाय बाजार चालू आहे आपली पदार्थाचा सेवन चालू आहे म्हणून आपण सांगत आहे याबद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे नाव बदनाम करता तुम्ही सात वर्षापासून तुम्ही आमदार आहात याचा खरा आता कोण आहे हे तुम्ही शोधून काढा खरा आकाश शोधा यावेळी कार्यकर्त्यांना विनंती करतो मावळमध्ये जे अवैध धंदे चालू आहे त्याचे शोधासाठी सगळ्यांनी कंबर कसा कोण हप्ते घेतो याचा शोध घ्या आपल्या मावळ तालुका हे व्यसनमुक्त करायचे आहे मी अवैध धंद्याबाबत स्वतः कमिशनर व पोलीसांना पत्रव्यवहार केले आहे.

माझ्याकडे पत्रव्यवराचे पोच पावती आहे तर अवैध धंदे आमचे असते तर असे पत्र आम्ही का दिले असते मी दिलेल्या पत्राचे व अवैध धंदे चे पेपरला आलेल्या बातमी देखील आहेत आमदार साहेब आपण भाजपावर ताशेरे ओढता तीन गट आहेत म्हणून तुम्हाला जर अवैध धंदे बंद पाहिजे असेल तर या आमच्याबरोबर आपण बसू चर्चा करू तसे होत नसेल तर आपण मुख्यमंत्री देवेंद्रजीकडे जाऊ आणी अवैध धंदे बंद करण्याबाबत चर्चा करू मी यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन करतो मावळ जर व्यसन मुक्त पाहिजे तर सगळ्यांनी कामाला लागा याचा खरा आका कोण आहे कोण हप्ते घेतात हे शोधून काढा असे जोरदार हल्लाबोल रघुवीर शेलार यांनी केला. या निषेध मोर्चा मध्ये महिला पुरुष अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!