पुण्याच्या राजकारणात ‘इनामदारी’ नडली; कपूर यांच्या रक्ताने राष्ट्रवादीचे पॅनल माखले!
पुण्याचं राजकारण म्हणजे एकेकाळी सुसंस्कृतपणाचा वारसा होता, पण आज तिथे रक्ताचे आणि खंडणीचे शिंतोडे उडू लागले आहेत! राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या पॅनलच्या विजयाच्या गप्पा मारल्या जात होत्या, ते पॅनल आज फारुख इनामदारांच्या पापामुळे पत्त्याच्या बंगल्यासारखं डगमगू लागलंय. निमित्त ठरलंय ते म्हणजे सादिक कपूर नावाच्या एका सामान्य माणसाची विदारक आत्महत्या
सादिकच्या हातावरचे अक्षर… की इनामदारांचा मृत्यूलेख? अहो, क्रूरतेचा कळस बघा! सादिक कपूर यांनी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली आणि त्यात फारुख इनामदारांच्या छळाचा पाढा वाचला. ज्या हातांनी कष्ट करून संसार उभा केला, त्याच हातावर स्वतःच्या मरणाचं कारण लिहिण्याची वेळ सादिकवर का आली? याचं उत्तर राष्ट्रवादीच्या त्या ‘दणकेबाज’ नेत्यांकडे आहे का?
खंडणी, छळ आणि जमिनीचा हाव्यास! कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला घरं पाडणारा आहे. २०१४ मध्ये पत्नीने विष घेतलं, तरी या इनामदारांची राक्षसी भूक भागली नाही. जमिनीसाठी त्रास, सततची खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमक्या… हेच का तुमचं पुण्याचे नेतृत्व? सादिक कपूरला मरणाच्या दारात ढकलून कसली निवडणूक लढवताय?
इनामदारांवरील या गंभीर गुन्ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलची झोप उडाली आहे. वॉर्डात मतं मागायला जाताना तोंड कसं दाखवणार? सादिक कपूरच्या लेकराबाळांचे अश्रू ज्यांच्या अंगावर उडालेत, त्यांना जनता माफ करेल का? ही निवडणूक आता विकासकामांची उरली नसून, ती ‘पाप विरुद्ध बाप’ अशी झाली आहे!
आता तरी शुद्धीवर या! राजकारण करा, पण त्यात माणुसकीचा गळा घोटू नका!” पुण्याची जनता हे उघड्या डोळ्यांनी बघतेय. ज्यांच्या नावावर रक्ताचे डाग आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या पॅनलचा ‘राम’ झाल्याशिवाय राहणार नाही. आता चेंडू जनतेच्या दरबारात आहे आणि हिशोब चुकता होणारच!
Views: 123


























