पत्रकार समाजाचा आधारस्तंभ! तारदाळ शाळेत पत्रकार दिन व दर्पणकार जयंती निमित्त विशेष कार्यक्रम

तारदाळ (प्रतिनिधी) :
समाजभान जपणारे आणि राष्ट्राचा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा ‘पत्रकार दिना’चे औचित्य साधून तारदाळ (ता. हातकणंगले) येथील कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेत उत्साहात संपन्न झाला. यावेळी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंतीही साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक मा. श्री. दत्तात्रय चोपडे होते. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्व पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आले. मा. श्री. सागर खोत सर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
पत्रकारांचा यथोचित गौरव
यावेळी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदाच्या वतीने बुके देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये खालील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला:
मा. श्री. गजानन खोत, मा. श्री. दिलीप खोत, मा. श्री. प्रमोद परीट
मा. श्री. बसगोंडा कडेमणी, मा. श्री. श्रीकांत कांबळे
मा. श्री. प्रवीण केर्ले, मा. श्री. आप्पासो भोसले
मा. श्री. विकास गायकवाड, मा. श्री. दादासो सुतार, मा. श्री. सुकुमार कांबळे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ निर्भीड असावा
यावेळी बोलताना गजानन कोले सर यांनी पत्रकारितेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, “लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे निर्भीड पत्रकार हे समाजाचे खरे मार्गदर्शक आहेत.” सत्काराला उत्तर देताना पत्रकार दिलीप खोत, प्रवीण केर्ले, गजानन खोत आणि प्रमोद परीट यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला शाळेचा सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अनिल सुतार यांनी मानले.


























