प्रभाग क्रमांक १६ मध्ये रावेत, किवळे, विकास नगर भागातील पाणी पुरवठाचे परिस्थिती सुधारा, अन्यथा १ नोव्हेंबर ला ठिय्या आंदोलन अटळ. :- नगरसेविका ऐश्वर्या तरस 


पिंपरी चिंचवड पाणीपुरवठा विभागाचे गळथान कारभारामुळे नागरिकांन मध्ये नाराजगीचे सुर.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

पिंपरी  : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी पुरवठासाठी नीट नियोजन होत नसल्याने प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी एल्गार पुकारला आहे रावेत , किवळे, विकास नगर प्रभाग क्रमांक १६ मधील पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा येत्या १ नोव्हेंबर रोजी प्रशासनाच्या विरोधात पाणी पुरवठा साठी मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा धडाडीचे नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी दिला आहे. रावेत येथील सर्वे क्रमांक ९६ मधील पंपिंग स्टेशनवर वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक क्षमतेचा जनरेटर तातडीने खरेदी करून बसवावा, अशी मागणी त्यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आताच्या पावसाळ्यात पंपींग स्टेशन चे गळथान कारभारामुळे वीज सहीत पाणीपुरवठा पुर्णपणे बंद पडले होते आणी नागरिकांचे खुप मोठे हाल झाले होते आठ दिवस वीजेचे लपंडाव सह पाणी पुरवठाचे ही खेळ खंडोबा झाले होते पाणी पुरवठा बाबत अनेक नागरिकांनी नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्या कडे तक्रार केली होती आता ही पाणी पुरवठा नीट होत नसल्याचे तक्रारी येत असल्याने नगरसेविका ऐश्वर्या तरस नागरिकांचे मुलभूत पाणी प्रश्ना बाबत १ नोव्हेंबर चे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला अल्टीमेटम टाईम दिले आहे

 

रावेत पंपिंग स्टेशनवर पाणीपुरवठ्यासाठी विविध टाक्या असून, या केंद्रातून प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पंपिंग प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी आवश्यक जनरेटरची सुविधा उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे तरस यांनी निवेदनात नमूद केले आहे.

परिणामी, हजारो नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

“वीज गेली तरी पाणीपुरवठा सुरू राहण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा” ..

पाणी ही नागरिकांची अत्यावश्यक मूलभूत गरज आहे. केवळ वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागणे ही गंभीर बाब आहे.

रावेत पंपिंग स्टेशनवर आवश्यक क्षमतेचा जनरेटर खरेदी करून बसविण्याची कार्यवाही १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावी. वीजपुरवठा खंडित झाला तरी पाणी उपसा व पंपिंग प्रक्रिया सुरू राहील, अशी व्यवस्था निर्माण करावी, अशी ठाम भुमिका घेत मागणी त्यांनी केली आहे.

या प्रश्नासंदर्भात नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी तसेच विद्युत विभागाचे सह शहर अभियंता यांना कावळे यांना खरमरीत निवेदन दिले आहे. निर्धारित मुदतीत आवश्यक कार्यवाही न झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात मोठे आंदोलनाचा इशारा तरस यांनी दिला आहे. आता प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांचे सुरळीत पाणीपुरवठा कडे सर्वाचे लक्ष लागले आहे. अन्यथा आंदोलन अटळ आहे असे नागरिकांमध्ये देखील जोरदारपणे चर्चा सुरू आहे.


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!