देहुरोड शहर युवक काँग्रेस (आय) पदाची धुरा परत मलिक हसन शेख यांच्या हाती.


देहुरोड शहर युवक काँग्रेस (आय) पदाची धुरा परत मलिक हसन शेख यांच्या हाती.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

देहुरोड दि.:- देहूरोड शहर काँग्रेस (आय) युवक पदाची शहर अध्यक्षपदी साठी परत एकदा मलिक हसन शेख यांची फेरियुक्ती करण्यात आले, नियुक्ती झाल्याने शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शहराध्यक्षपदी फेरीयुक्त झाल्याने देहुरोड शहराला परत एकदा नव संजीवनी मिळाल्याचे कार्त्यांमध्ये जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे मावळ तालुका युवक काँग्रेसचे विधानसभेचे अध्यक्ष ॶॅड. संदीप भूपत सातकर यांनी मलिक शेख यांना फेर नियुक्तीचे पत्र दिले आहे आपण सातत्याने युवकांच्या प्रश्नावर काम करत आहात युवकांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होऊन पक्षाचे काम तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपण जिद्दीने करत आहेत आणि खात्रीपूर्वक करणार असे अश्या बावळून आपली शहराध्यक्षपदी फेर नियुक्ती करत आहे,

तसेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जी सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी व महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष शिवराज बापूसाहेब मोरे व पुणे जिल्हा युवक अध्यक्ष उमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वसामान्य युवकांना काँग्रेस पक्ष हा हक्काचे व्यासपीठ वाटेल आणि पक्ष वाढीसाठी दिवस रात्र मेहनत घ्याल अशी अश्या बाळगत आहे आपण पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरण सामान्या पर्यंत पोचवण्यासाठी सहकार्य करणार असा ठाम विश्वास आहे असे फेरनियुक्ती पत्रात म्हटले आहे.

*मलिक शेख यांनी केलेले कार्याची दखल* मलिक शेख हे देहुरोड शहरात युवकांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवत आले आहे व सामाजिक समस्यासाठी वेळोवेळी प्रत्येक आंदोलना सहभाग घेऊन काम करत आहेत तसेच संविधान सन्मान संघ सारख्या संघटनेत महापुरुषांचे जयंती पुण्यतिथी निमित्त सामाजिक उपक्रमात भाग घेत आहेत तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डात लोक समस्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करून सामान्य तळागाळातील लोकांना सहकार्य करून न्याय मिळवून देण्याचे काम आणि प्रारुप मतदार यादी तुन 9230 नावे वगळण्या प्रकरणी वेळोवेळी आंदोलनात भाग घेतले आहे उपवर्गीकरण अ ब क ड रद्द करावे यासाठी सर्व पक्षीय महामोर्चात संविधान सन्मान संघटनेच्या वतीने आपण जोरदार निदर्शने करून मोर्चेमध्ये सहभागी होऊन काम केले आहे कॅन्टोन्मेट बोर्ड चे सात वार्डात लोक समस्यासाठी लढा दिला असे या विविध कार्यामुळे वरिष्ठांनी मलिक शेख यांची फेर नियुक्ती करण्यात आली आहे. मलिक हसन शेख यांची फेर नियुक्ती झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे फेर नियुक्ती ची वार्ता कळताच शहरात फटाके ची आतिषबाजी करून कार्यकत्यांनी जल्लोष साजरा केला तसेच त्यांच्यावर अनेक स्तरावरून अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!