पुणे जिल्हा हादरला राजगुरुनगर मध्ये वर्गा मध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला.
प्रतिनिधी :
राजगुरुनगर पुणे : आज कालच्या मुलान मध्ये भाईगिरी करण्याचें नशा दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि राजगुरुनगर हे ऐतिहासिक नगर आहे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे खाजगी क्लास मध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेला वादातून एका विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली जखमी विद्यार्थ्याला रुग्णाला दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
राजगुरू नगर मध्ये दहावीतील विद्यार्थ्यांची वर्गात मित्राच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करत त्याचा गलत चिरला हत्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला पुष्कर शिंगाडे असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे तर प्रयाग मांजरे हे पळून गेला आहे दरम्यान या घटनेमागील धक्कादायक कारण समोर आले आहे डीवायएसपी अमोल मांडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये तीन महिन्यापूर्वी भांडण झाले होते त्याचवेळी पोलिसांना याबाबत कळवलं असतं तर ही घटना घडली नसती हल्ला करणाऱ्या मुलाने गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केले शिकवणीमध्ये एकाच बेंचवर बसलेल्या असतानाही धक्कादाय घटना घडली आता हल्ला करणाऱ्या मुलाचा शोध सुरू आहे तसेच पालकांनी या घटनेतून बोध घ्यायला हवा आणि स्वतःच्या मुलासोबत योग्य हे संभाषण ठेवायला हवे आपल्या मुलाचे मित्र कोण कोण आहेत ते फावल्या वेळेत काय करतात कुठे बसतात याची माहिती पालकांनी ठेवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे .
मिळालेल्या माहितीनुसार पुष्कर शिंगाडे आणि प्रयाग मांजरे यामध्ये दोन दिवसांपूर्वी भांडण झाले होते दोघांमध्ये किरकोळ कारणावर हाणामारी झाली त्या घटनेची माहिती क्लास चालकांनी पालकांना दिली नव्हती तसेच हे भांडण होऊनही क्लास चालक आणि शिक्षकांनी कोणती खबरदारी घेतली नाही या उलट दोघांनाही एकाच वाक्यावर बसवण्यात आले होते भांडण याची माहिती समजतात मयत पुष्कर शिंगाडे यांच्या वडिलांनी क्लास चालकावर गंभीर आरोप केले आहेत जर क्लास चालकांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाबद्दल आम्हाला सांगितलं असतं आणि सावध केल्यास तर आज आमचा मुलगा जिवंत असता असा शब्दात संताप व्यक्त केला पालकांनी पोलिसाकडे कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान नेमका वाद कशामुळे झाला आणि घटनेची पार्श्वभूमी काय याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.



























