ब्रेकिंग न्यूज: पुणे मनपाचे माजी नगरसेवक व मुस्लिम बँकेचे व्हाईस चेअरमन एडवोकेट अय्युब इलाईबक्ष शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड!


ब्रेकिंग न्यूज: पुणे मनपाचे माजी नगरसेवक व मुस्लिम बँकेचे व्हाईस चेअरमन एडवोकेट अय्युब इलाईबक्ष शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड!

पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ एडवोकेट अय्युब इलाईबक्ष शेख यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (अजित पवार गट) जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे पुणे शहरासह राज्यातील अल्पसंख्यांक समाजात पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

खासदार सुनील तटकरे यांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी :

एडवोकेट अय्युब इलाईबक्ष शेख यांच्या प्रदीर्घ सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनुभवाची दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभाग ‘कार्याध्यक्ष’ पदी नियुक्ती केली. मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना अधिकृत नियुक्ती पत्र देण्यात आले.

सहकार आणि विधी क्षेत्रातील मोठा चेहरा: एडवोकेट अय्युब इलाईबक्ष शेख हे मुस्लिम बँकेचे व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत असून, समाजातील विविध प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळात अल्पसंख्यांक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठे बळ मिळणार आहे.

अभिनंदनाचा वर्षाव: या निवडीनंतर पुणे शहर आणि परिसरातून एडवोकेट अय्युब इलाईबक्ष शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण जोमाने कार्य करू, असा विश्वास शेख यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 


कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

42
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!