फरार आरोपी अटकेत, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त , तर नाना पेठ येथील कारवाई मध्ये ३६,६७,९४९ चा मुद्दे माल जप्त
प्रतिनिधी :
पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कुख्यात आंदेकर टोळीविरोधात मोठी कारवाई करत दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी नागे गणेश उर्फ सुरज अशोक वड़ा (वय ३०, रा. मंगळवार पेठ) याला कोल्हापूर जिल्ह्यातून अटक केली आहे. फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १४९/२०२४ अंतर्गत दाखल गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी होता.
पोलीस उपनिरीक्षक गौरव देव व पोलीस अंमलदार दिलीप गोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कुरता, भुदरगड (जि. कोल्हापूर) येथे सापळा रचून ही अटक करण्यात आली.
दरम्यान, दि. १६/१२/२०२५ रोजी खंडणीविरोधी पथक पेट्रोलिंग करत असताना जांदेकर टोळीशी संबंधित विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे गावठी बनावटीचे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. चौकशीत त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल, एअर पिस्टल, रोख रक्कम, धारदार शस्त्र, मोपेड स्कूटर व इतर साहित्य असा एकूण ₹१,३७,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यासोबतच नानापेठ परिसरातील संबंधित ठिकाणी झडती घेतली असता रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, विविध करारनामे, आयकर कागदपत्रे, पतसंस्था पावत्या व इतर महत्त्वाचे दस्तऐवज असा एकूण ₹३६,६७,९४९/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त श्रीलंकादेशमुख, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री निश्रील पिंगळे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट-०१ यांनी संयुक्तपणे केली.




























