इचलकरंजीच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा ; हिरा राम हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेंद्र सपकाळ यांचा राज्य स्तरावर सन्मान
इचलकरंजी (प्रतिनिधी): येथील अशोका शिक्षण संस्थेच्या हिरा राम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र सपकाळ यांची ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाच्या’ कौन्सिल सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे इचलकरंजीच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान
या निवडीचे अधिकृत पत्र शिक्षक आमदार श्री. जयंत आसगावकर साहेब यांच्या हस्ते श्री. सपकाळ यांना प्रदान करण्यात आले. यावेळी शिक्षक भारतीचे पुणे विभागीय अध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे सर्वेसर्वा श्री. दादासाहेब लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवर
या सोहळ्याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते, यामध्ये:श्री. राहुल पवार (चेअरमन, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ) श्री. रवींद्र मोरे (व्हाईस चेअरमन) श्री. मिलिंद पांगिरेकर श्री. इरफान अन्सारी (संपर्कप्रमुख) तसेच बाजीराव साळवी, अशोक हुबळे, नंदकुमार गाडेकर, धनवडे सर, कोळी सर, अशोक निंबाळकर, संजय लोटके, राजेंद्र कडाळे, क्रीडा शिक्षक बर्गे सर, सुरेश पाटील, दादा गडदे, किसन भालचिम इत्यादींचा समावेश होता.
संस्थेकडून कौतुक
श्री. सुरेंद्र सपकाळ यांच्या या यशाबद्दल अशोका शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार श्री. अशोकराव जांभळे, सचिव सुहास जांभळे आणि संचालक सचिन जांभळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


























