गुन्हे शाखा युनिट ३ची उल्लेखनीय कामगिरी


घरफोडी करून परराज्यात धूम स्टाईलने फरार होणारे अट्टल चोरांना ४८ तासाच्या आत गुन्हे शाखा युनिट ३ ने अटक करून आरोपीकडून २५ लाख १३ हजार ५९८ रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने केले जप्त,

– देहूरोड दि.:- घरफोडी करून पराजय धूम स्टाईलने फरार होणारे अट्टल चोरांना जेर बंद करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट३ पिंपरी चिंचवड कडील पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांना मिळालेल्या गुप्त बातमी प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे तसेच पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोराडे, सागर सूर्यवंशी, श्रीधन इचके, संदीप सोनवणे, मनोज साबळे, ऋषिकेश भोसुरे, अजित रुपनवर, योगेश कोळेकर, शशिकांत नांगरे, बाळासाहेब भांगले, स्वप्निल महाले, सुंदर थोरात, समीर काळे, सुधीर दांगट, दिलीप राठोड, तुषार वराडे, निखिल फापाळे, प्रदीप राळे, राजकुमार इघारे, असे पथक तयार करून चाकण पोलीस स्टेशन हद्दीत इंद्रायणी हॉटेलच्या समोर पुणे नाशिक हायवे लगत वाकी चाकण येथे सापळा लावून थांबले असता एक पांढऱ्या रंगाच्या टाटा टेम्पोमध्ये पाठीमागे एक विना नंबरची दुचाकी गाडी व समोर केबिनमध्ये तीन इसम संशयितरित्याने बसलेले दिसून आले सदर टेम्पोचे जवळ पथक जात असताना आत मध्ये बसलेले इसामाना संशय आल्याने त्यांनी लगेच पळून जाण्याचा प्रयत्न केले असता गुन्हे शाखा युनिट तीन कडील अधिकारी व स्टाफ यांनी मोठ्या सीताफिने बळाचा वापर करून संशयित इसम नामे १) मोसीन शौकतअली शेख वय ३२ रा लोहीया नगर सत्यकम स्कूल जवळ एम ब्लॉक मेरठ उत्तर प्रदेश २) उदय वीर मलखान सिंग सहासी वय ३६ रा गल्ली नंबर ३ प्रताप नगर जयभीम नगर मेरठ उत्तर प्रदेश,३) विनय कुमार गंगासरण वय ३४ राहणार ग्राम ब्रिजोली खरखोदा उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेले बॅक ची पाहणी केली असता त्यामध्ये घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्य टेम्पोमध्ये विना नंबरची दुचाकी वरील नमूद इसामाच्या जवळ सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून आले. मिळून आलेल्या सोन्या-चांदीचे दागिने व रक्कम बाबत सदर इसामाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आम्ही मेरठ उत्तर प्रदेश येथून एका चार चाकी वाहनात दुचाकी टाकून पिंपरी चिंचवड शहरात वाहन पार्क करून दुचाकीने घरफोडी करून परत शंभर ते दीडशे किलोमीटर पोलिसांना समजू नाही व थांग पत्ता लागू नये म्हणून दुचाकी वर जातो व त्यानंतर निर्जन स्थळे दुचाकी ही टेम्पोमध्ये टाकून मेरठ उत्तर प्रदेश येते निघून जातो असे सांगितले.

सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा टेम्पो यू पी १५ जे टी २५९२, एक होंडा कंपनीची शाईन दुचाकी , एक मोबाईल फोन इतर साहित्य तसेच सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १२ लाख १३ हजार ५९८ रुपये किमतीचे जसेच्या तसे १३ लाख रुपये किमतीचे नवीन एक टेम्पो व दुचाकी ४८ तासाच्या आत जप्त करून करून १) दिघी गुन्हा रजिस्टर नंबर ६६३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) ३३१(३),३(५) २) चाकण गुन्हा रजिस्टर नंबर १०९०/ २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) ३३१ (३) ३) काळेवाडी गुन्हा रजिस्टर नंबर ५८०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) ३३१(३) ४) सांगवी गुन्हा रजिस्टर नंबर ५५८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ)३३१(३) असे एकाच दिवशी केलेल्या घरफोडीचे ठिकाणे आरोपीने दाखवून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत व यापूर्वी केलेल्या घरफोडीची माहिती घेऊन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे करीत आहेत . सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड पोलीस उपायुक्त गुन्हे शिवाजी पवार, पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली व सूचनाप्रमाणे संतोष कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट तीन यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोराडे, सागर सूर्यवंशी, श्रीधन इचके, संदीप सोनवणे, मनोज साबळे, ऋषिकेश भोसुरे, अजित रुपनवर, स्वप्नील महाले, योगेश कोळेकर, शशिकांत नांगरे, बाळासाहेब भांगळे, सुंदर थोरात, समीर काळे, सुधीर दांगट, दिलीप राठोड, तुषार वराडे, राजकुमार इघारे, निखिल फापाळे, प्रदीप राळे, तांत्रिक विश्लेषक प्रकाश ननावरे या सर्वांनी ही कारवाई केली आहे


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!