॥ विशेष लेख ॥ ब्रह्मांड धावेल असा हा अचाट मेंदू ; संगणकाची ‘चूल’ पेटवणारी मानवी बुद्धीची अफाट शक्ती!
निसर्गाची करामत तरी पहा! ज्याला आपण साध्या हाडामासाचा गोळा समजतो, त्या कपाळाच्या करंडीत विधात्याने काय किमया दडवून ठेवली आहे, याचा हिशोब मांडला तर भल्याभल्यांचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. आजच्या संगणकीय युगात ‘जीबी’ आणि ‘टीबी’च्या गप्पा मारणाऱ्या शहाण्यांनी एकदा आपल्या डोक्यातील या ‘सुपर कॉम्प्युटर’कडे वाकून पहावे, म्हणजे त्यांना स्वतःच्या क्षुद्रपणाची जाणीव होईल!
१ लाख ५६ हजार फोनचा बाप!
आजकालच्या पोरांना हातातील १६ जीबीच्या मोबाईलचा मोठा माज असतो. पण बाबांनो, तुमच्या या इवल्याशा मेंदूची साठवणूक क्षमता तब्बल २.५ पेटाबाईट आहे! गणित येत नसेल तर सोप्या भाषेत सांगतो— १६ जीबीचे तब्बल १ लाख ५६ हजार फोन एकत्र केले, तर जितकी मेमरी होईल, तितकी ताकद तुमच्या एका मेंदूत आहे. म्हणजे तुमचं डोकं हे डोकं नसून ज्ञानाचा अथांग महासागर आहे!
संगणकालाही घाम फोडणारी गती!
जगातील वेगवान संगणक म्हणजे काय? काहीच नाही! आमचा मेंदू एका सेकंदात ३८ हजार ऑपरेशन्स लीलया पार पाडतो. संगणकाला चालवण्यासाठी वीज लागते, पण मानवी मेंदूला फक्त विचारांची ऊब लागते. मानवी बुद्धीची ही झेप पाहिल्यावर खात्री पटते की, या विश्वात मानवासारखा दुसरा चमत्कार नाहीच!
रक्तवाहिन्यांचे एक लाख मैलांचे जाळे!
ज्याला आपण साध्या नसा म्हणतो, त्या जर एकापुढे एक मांडल्या, तर त्यांची लांबी १ लाख मैल भरेल. अहो, पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालता येतील इतकं लांब हे जाळं आपल्या शरीरात दडलंय. आणि ते ‘न्यूरॉन्स’? त्यांची संख्या आहे १०००० कोटी! आकाशातल्या चांदण्या मोजता येतील, पण डोक्यातील या मज्जापेशी मोजायच्या ठरवल्या, तर एका माणसाला ३१७१ वर्षं लागतील!
आरोग्याची जपणूक हीच खरी संपत्ती!
असा हा अफाट क्षमतेचा ठेवा लाभलेला मेंदू आणि शरीर निकामी होऊ द्यायचे नसेल, तर आरोग्याची काळजी घेणे हेच आपले पहिले कर्तव्य आहे. जोपर्यंत शरीर व्याधीमुक्त राहत नाही, तोपर्यंत बुद्धीची ही झेप गगनाला गवसणी घालू शकणार नाही. म्हणूनच, शरीराला ‘मधुमेह’ सारख्या वाळवीपासून वाचवणे ही काळाची गरज आहे!
अनिस जमादार : +91 77981 09612
मधुमेह मुक्त अभियान, सांगली



























