श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पेठ वडगाव महाविद्यालया मध्ये पर्यावरणाचे महत्त्व या विषयावर व्याख्यानचा कार्यक्रम संपन्न झाला .

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबंप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड. पेठ वडगाव महाविद्यालयामध्ये दि. 15 नोव्हेंबर 2025 रोजी दैनंदिन जीवनातील पर्यावरणाचे महत्त्व या विषयावरती डॉ. श्री. राहुल माने (सहाय्यक प्राध्यापक रसायनशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ निर्मळे -चौगुले आर. एल. मॅडम होत्या. प्रथमता तज्ञ व्याख्यात्यांचे स्वागत करण्यात आले .
प्रमुख व्याख्याते डॉ. श्री राहुल माने सरांनी दैनंदिन जीवनातील पर्यावरणाचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन पर्यावरणातील कोणत्याही घटकाचे नुकसान न करता कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले त्यासाठी त्यांनी प्लॅस्टिक, केंदाळ, जलपर्णी, शेतातील टाकाऊ चारा इत्यादी घटकांची उदाहरणे दिली. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना प्रा. राहुल सरांनी दैनंदिन जीवनात पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड. पेठ वडगावच्या सेमिनार हॉलमध्ये घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, छात्राध्यापक, छात्राध्यापिका इ. उपस्थित होते. प्रथम प्राचार्या निर्मळे मॅडम यांनी पाहुण्यांची ओळख व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. सावंत ए.पी. यांनी आभार मानले. अशाप्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला.































