दानम्मा देवी यात्रा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाली


दानम्मा देवी यात्रा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाली

सालाबाद प्रमाणे याही वर्षी 20/11 2025 रोजी दानम्मा देवी यात्रा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाली सकाळी महाअभिषेक चे मानकरी सौ व श्री भालचंद्र बिळगी, सौ व श्री मनोज चचडी, श्री प्रशांत अथणे, श्री प्रशांत भिलवडे सर इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते महा अभिषेक करण्यात आले त्यानंतर 11.00 वाजता दोन ते अडीच हजार महिलांचे सुहासिनी पुजनाचा कार्यक्रम दानेश्वरी महिला मंडळाचे सर्व महिलांच्या वतीने करण्यात आले.व दुपारी 12.30 वाजता महाआरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या शुभहस्ते महाप्रसादाची वाटप सुरू करण्यात आले.

अडीच ते तीन हजार लोकांचा महाप्रसाद अतिशय उत्साहात संपन्न झाला.

सायंकाळी 5.30 वाजता महाआरती व पालखी पूजन तसेच पालखी मिरवणूक झाल्यानंतर दीपोत्सव कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक व मार्गदर्शक श्री दीपक राशिनकर, तसेच C A श्री निखिल धड्ड आणि महिला मंडळाचे अध्यक्ष श्री देवी बाळीफडी, मंडळाचे अध्यक्ष सुभाष घुणकी, उपाध्यक्ष प्रमोद हलभावी, सेक्रेटरी शिवकुमार मुरतले, खजिनदार राजू भावीकट्टी, इतर सर्व पदाधिकारी इराण्ण चचडी, इराण्णा मट्टीकल्ली, शंकर बिल्लूर, महेश कब्बूर, राजू हारुगेरी, नंदू हेरलगी, श्रीशैल बिल्लूर, लिंगाप्पा कराडे, प्रकाश वरदाई, सोमनाथ भावीकट्टी, दत्तात्रय स्वामी, बसवराज तलवार, विनायक वरदायी, सागर हलवावी, तसेच मंदिराचे स्वामी रमेश स्वामी, निरंजन हिरेमठ, श्वेता हिरेमठ महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य, युवक मंडळाचे सर्व पदाधिकारी, मंदिर कमिटीचे सर्व पदाधिकारी, परिसरातील सर्व नागरिक आसपासच्या गावातील सर्व भक्त इचलकरंजी, खोतवाडी, तारदाळ, चंदुर, यड्राव, कोरोची, संगमनगर इत्यादी भागातून मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते व हा दिवसभरातील दानम्मा देवी यात्रेचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!