आदर्श विद्यामंदिर, रामभाऊ जगताप हायस्कूल मध्ये बक्षीस वितरण सोहळा पार पडला.


आदर्श विद्यामंदिर, रामभाऊ जगताप हायस्कूल मध्ये बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

इचलकरंजी : येथील आदर्श्श शिक्षण मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व रामभाऊ जगताप हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाला शहापूर हायस्कूलचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक आणि अभिनेते महंमदरफिक मांगुरें, कार्याध्यक्ष रमेश मर्दा, माजी अध्यक्ष गोवर्धन बोहरा, विनायक सपाटे उपस्थित होते.

सोहळयाची सुरुवात ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा पूजन व दीपप्रज्जलनाने झाली. मुख्याध्यापिका गीता खोचरे यांनी प्रास्ताविक केले, विनायक सपाटे यांनी अतिथी परिचय दिला. मांगुरे यांनी अभिनय क्षेत्रातील अनुभव सांगत क्रीडेमुळे घडणाऱ्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला. विद्यार्थी कला व त्रीडा दोन्ही क्षेत्रांत प्राविण्य मिळवून नाव उजळावं, असा संदेश त्यांनी दिला, कार्यक्रमा दरम्यान त्यांनी गायन आणि विनोदी प्रसंगांद्धारे विद्याथ्थ्याचये मनोरंजनही केले. मान्यवरांच्या हस्ते व्यक्तिगत आणि सांधिक स्पर्धामधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन नागेश चिल्लाळ, गीता साळुंखे, सुजाता बदर यांनी केले.


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!