महाराष्ट्र शासन व पालिकेचा मनमानी कारभार ,  जुन्या धायरीसाठी तिप्पट टॅक्स तर उर्वरित मध्ये कर माफी राज्यपालांना साकडे: आम आदमी पक्षाचे जन आक्रोश आंदोलन


पुणे :   सिंहगड रस्त्यावरील सर्वात अधिक दिड लाख लोकसंख्येच्या धायरी गावात पुणे महापालिकेने वेगवेगळे मिळकत कर आकारणी केली आहे.

१९९७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या धायरी गावच्या जुन्या हद्दीतील नागरिकांना तिप्पट मिळकत कर आकारणी केली आहे तर २०१७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उर्वरित धायरी गावात कर माफी दिली आहे.

शासनाच्या या दुप्पटी , अन्यायकारक कारभारामुळे नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अन्यायकारक मिळकत कर आकारणी मुळे आर्थिक संकट कोसळलेल्या जुन्या धायरीतील कर आकारणीला तातडीने स्थगिती देण्यात यावी तसेच शासनाने पालिकेला संपूर्ण धायरी गावात समान कर आकारणी करण्याचे आदेश द्यावेत असे साकडे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना  घातले आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे शहर आम आदमी पक्षाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन सुरू करण्यात आले आहे. .

आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,  पालिकेच्या या मनमानी कारभारामुळे लाखो मिळकत दारांवर मालमत्ता विकण्याची वेळ आली आहे.  जुन्या हद्दीतील धायरी गावातील नागरिकांवर जबरदस्तीने तिप्पट टॅक्स आकारला आहे. तर नवीन हद्दीतील भागासाठी टॅक्स माफीचे आदेश शासनाने दिले आहेथ.जुन्या हद्दीतील तिप्पट टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना कोणीच वाली नाही. शासनाने एकाच गावाला दोन तुकडे करून एका भागाला सवलत आणि दुसऱ्या भागावर सुलतानी मिळकत कर आकारणी केली आहे. त्यामुळे हजारो नागरिकांन उत्पन्नापेक्षा कर आकारणी अधिक केली आहे.

जुन्या धायरी हद्दीतही नवीन हद्दी प्रमाणेच सेवा सोयी पुरवल्या जात आहेत असे सांगून धनंजय बेनकर म्हणाले,  एक गाव, एक महापालिका असुनही शासन आणि पालिका धायरी करांवर अन्याय करत आहे. सर्व ग्रामस्थांना समान व न्याय वागणूक द्यावी शासनाने एकाच गावामध्ये दुजाभाव करू नये.


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!