श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पेठ वडगाव महाविद्यालयामध्ये संविधान दिन साजरा.


श्री ‌बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबंप संचलित *कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड. पेठ वडगाव* महाविद्यालयामध्ये *दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी* संविधान दिन साजरा करण्यात आला .

{

सर्वप्रथम महाविद्यालयातील प्राचार्या ,सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व छात्र अध्यापक यांनी संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन केले. प्रथम वर्षाचे बी.एड. छात्राध्यापक ,महाविद्यालयाच्या प्राचार्या ,सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सकाळी परिपाठाच्या वेळी सामूहिक रीतीने संविधानातील प्रास्ताविकेचे समूहवाचन केले. त्याचबरोबर प्रथम व द्वितीय बी.एड. छात्राध्यापकांसाठी संविधानावरती विशेष अशी ऑनलाईन प्रश्नमंजुषाही घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नमंजुषेस भरभरून प्रतिसाद दिला. आपले संविधान हा भारतीय लोकशाहीतील महत्त्वाचा घटक आहे. त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. सर्वांनी संविधानाप्रमाणे आचरण करण्याची शपथ घेतली.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निर्मळे चौगुले आर.एल. व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे संस्था अध्यक्ष श्री. विजयसिंह माने साहेब यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. अशाप्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला.


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!