शांततेच्या सहनशीलतेचा प्रतिक असलेल्या धम्मभुमीत पाय ठेवताच मला नागपुरच्या दिक्षा भुमी ची आठवण झाली, सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करते :- पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर


देहूरोड दि. :- शांततेच्या सहनशीलतेचा प्रतिक असलेल्या धम्मभुमीच्या ऐतिहासिक धम्मभूमी येथे पाय ठेवताच मला नागपुरच्या दिक्षा भुमी ची आठवण झाली व इथे येताच मला ऐतिहासिक धम्मभूमी चे बंदोबस्ताची नियोजन करण्याची संधी परत मला प्राप्त झाले हे माझे सौभाग्य आहे व मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करते अशी भावना पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी देहुरोडच्या बैठकीत व्यक्त केले.
देहूरोड ऐतिहासिक धम्मभूमीच्या ७१ व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने देहूरोड पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आले होते या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना परिमंडल ४ चे नुकतेच पदभार सांभाळलेले स्वीकारलेले पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या उपस्थितीत हे बैठक पार पाडण्यात आले या वेळी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले व नवीन पदभार सांभाळलेले परिमंडल ४ चे पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांचे प्रथम स्वागत केले आणि उपस्थित मान्यवरांना आपले सूचना मांडण्यात सांगितले.
यावेळी संविधान सन्मान संघचे अध्यक्ष रामदास ताटे यांनी वयोवृद्ध लोक व इतर अनुयायी ऐतिहासिक धम्मभूमी येथे बुद्धाचा चरणी नतमस्तक होण्यासाठी वेगवेगळ्या परिसरातुन येत असतात यामुळे ट्राफिक ची समस्या उद्भवतो पुणे वरून येणारे ट्राफिक कॅन्टोन्मेंट शाळेच्या इथून वळवावे व लोणावळा येथून येणारे वाहतूक हे धम्मभूमीच्या मागच्या पठगणांत लाम थांबवावे जेणेकरून ट्रॅफिकचे समस्या होणार नाही असे सुचवले. धम्मभूमी कृती समितीचे धर्मपाल तंतरपाळे यांनी शौचालय पाणी लाईट ची कमतरता व धम्मभूमी चा रस्ता हे अत्यंत खराब झाले आहे ते लवकरात लवकर बनविण्यात यावे येणारे अनुयायीना दर्शनाचा त्रास होऊ तसेच पाणी, वीज याची सुविधा योग्यरित्या कॅन्टोन्मेंट बोर्डाने पुरविले पाहिजे असे सूचना मांडल्या रघुवीर शेलार यांनी उपस्थित बोर्डाचे अधिकाऱ्यांना धर्मपाल तंतरपाळे यांनी सुचवलेल्या प्रमाणे रस्त्याची दुरुस्ती ताबडतोब करावे चांगले रोड बनविता नाही आले तरी कमीत कमी त्या ठिकाणी खड्डे आहे त्या ठिकाणी ठिगाळ (पॅच) लावून रस्ता नीट करावा तसेच श्रीमंत शिवशरण यांनी सुचविलेल्या टेंन्ड व जेवणाची सोय होऊ जेणेकरून भाविकांना त्रास होणार नाही तसेच याबाबत मी कँटोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन समस्या सांगणार आहे असे सांगितले, यावेळी आरपीआयचे जेष्ठ नेते शिवशरण यांनी देहुरोडची धम्म भुमी हे ऐतिहासिक धम्मभूमी असल्याने विविध राज्यातून लोक येत असतात दर्शनासाठी येत असताना व रात्रीच्या वेळी गाडीचे साधन नसल्याने भाविकांना येथेच मुक्काम करावे लागतो तर कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या वतीने त्यांना भोजनाची व झोपण्यासाठी तंबु (टेंन्ड)ची व्यवस्था करण्यात यावी असे सुचवले तेव्हा गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरमीत सिंग रक्तू यांनी भोजनाची व्यवस्था गुरुद्वारेच्या मार्फत आमची समिती आम्ही करणार अशी हमी त्यांनी घेतले, असे उपस्थित लोकांनी आप आपले सुचना मांडल्या. यावेळी प्रथमच रुजू झालेला परिमंडल ४ चे पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांचे संविधान सन्मान संघच्या वतीने अध्यक्ष डॉ रामदास ताटे यांनी पंचशील व भारताचे संविधान प्रदान केले
यावेळी संविधान सन्मान संघ चे मोझेस दास, श्रीमंत शिवशरण, बाबु हिरमेठकर इरप्पा तेलगु, चंद्रशेखर पात्रे उपस्थित होते तर धम्मभूमी अष्ट प्रधान मंडळाच्या वतीने धर्मपाल तंतरपाळे व अशोक गायकवाड, संगिता वाघमारे यांनी पुष्पगुच्छ व पंचशील प्रदान करून सत्कार केले. यावेळी नवीन पदभार स्वीकारलेले पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी मी सर्व प्रथम बाबासाहेब यांना अभिवादन करते शांततेच्या सहनशीलतेचा प्रतिक असलेल्या ऐतिहासिक धम्मभूमी येथे पाय ठेवताच मला नागपुरच्या दिक्षा भुमी ची आठवण झाली यापूर्वी मी नागपुरच्या दिक्षा भुमी येथे आठ वर्षे नागपुरच्या दिक्षा भुमीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन व बंदोबस्त माझ्या कारकिर्दीत केले पण आज या ठिकाणी सर्व जाति धर्मांचे लोक उपस्थित आहे हे बघुन मला आनंद होत आहे कार्यक्रम कुठलाही असो तीन गोष्टींचा आनंद मिळाला पाहिजे ते तीन गोष्टी शांति ,आनंद, समाधान हे मिळाले पाहिजे कारण कार्यक्रम कुठलाही असो प्रार्थना करण्याचे वेगवेगळे स्थान असतं मग ते नमाजपठण असो पुजा, ध्यान, असो त्या ठिकाणी आपले जबाबदारी आहे ते कार्यक्रम कसे आनंदाने शांतताने पार पाडायची आज प्रत्येक लोकांनी समस्या व सुचने बाबत पत्रव्यवहार केले, नुसते पत्र देऊन माझी जिम्मेदारी पुर्ण झाले म्हणून हात झटकु नये मी देलेले पत्रात लाईट दिवे रस्ता पाणी दवाखाना रुग्णवाहिका सेवा हे उपलब्ध आहे कि नाही याची दखल घेतली पाहिजे किंवा मी दिलेला शब्द मी पाळत आहे का? हे ही बघणे आवश्यक आहे
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना श्वेता खेडकर यांनी सुचना दिल्या कि पार्किंग रस्ता व ट्राफीक कसे हताळणार याची सर्वांनी दक्षता घ्यावी या करीता पोलीसांना बरोबर महिला पुरुष मदतनीस पथक (वाॅलेन्टीयर्स) यांचे ही पथक नेमणार नेमण्यात येणार आहे जणे करून कोणालाही त्रास होणार नाही. सर्वांनी मिळून हे कार्यक्रम आनंदाने चांगल्या पद्धतीने पार पाडा तसेच सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या यावेळी देहूरोड मधील सर्व राजकीय पक्ष संघटना समिती व पत्रकार बांधव आयबीएन लोकमत चे गणेश दुडम देहु देहूरोड चे दैनिक पुढारीचे रमेश कांबळे साप्ताहिक उपेक्षित वऱ्हाड व द प्रेस मीडीया लाईव्ह चे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे इतर सामाजिक संघटनेचे लोक उपस्थित होते.


























