सावधान! तुतारीत फुंकर कुणाची? अजितदादांच्या ‘त्या’ विधानाने कोंढव्याच्या रणांगणात ‘पंजा’चा महासंग्राम!
पुणे, ७ जानेवारी २०२६: “अहो दादा, हे काय पुटपुटलात.? ‘घड्याळ आणि तुतारी एकच आहे?’ याला राजकारण म्हणायचे की जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक? पुण्याच्या जाहीर सभेत अजितदादांनी जो हा अजब गौप्यस्फोट केला आहे, त्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील उरलीसुरली नीतिमत्ताही वेशीवर टांगली गेली आहे. याचा सरळ, स्पष्ट आणि नागडा अर्थ हाच की – काकांनी पुतण्याला भाजपाच्या मांडीवर बसायला मूक संमती दिली होती! सत्तेच्या उबदार गादीसाठी ‘तत्त्व’ आणि ‘निष्ठा’ यांचा असा लिलाव सुरू असलेला पाहून आज साक्षात लोकशाहीलाही रडू कोसळले असेल.”
सत्ताधाऱ्यांची ‘पाप’ कुंडली
बिल्डर लॉबीशी साठगाठ: बेकायदेशीर गुंठेवारीच्या नावाखाली सद्य नगरसेवकांनी लाखांचे नाही, तर करोडोंचे ‘हात ओले’ केल्याचा संताप.
विकासाचा बोजवारा:
निकृष्ट रस्ते, अपुरा पाणीपुरवठा आणि कचऱ्याचे साम्राज्य; कोंढवा की नरक? मतदारांचा संतप्त सवाल.
नशाखोरी आणि गुंडागिरी :
प्रभागात वाढलेली नशाखोरी आणि दहशतीला सत्तेचा वरदहस्त असल्याचा खळबळजनक आरोप.
कोंढव्याच्या रणांगणात ‘विद्रोहाची’ ठिणगी..!
कोंढव्याच्या या प्रभाग क्रमांक १९ मध्ये सध्या जे वारे वाहत आहेत, ते साधेसुधे नाहीत. अजितदादांच्या या विधानाने बहुसंख्य मुस्लिम समाज असलेल्या या भागात संतापाचा वणवा पेटला आहे. मतदारांना आता कळून चुकलंय की, इथलं ‘घड्याळ’ असो वा ‘तुतारी’, या सर्वांच्या चाव्या शेवटी नागपूरच्या हातामध्ये आहेत! ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजल्यानंतर कोंढवा-कौसर बागेतील जनतेने आता भाजपाच्या या छुपेगिरीला गाडण्याचा निर्धार केला आहे.
काँग्रेसची ‘लाट’ की विजयाचा ‘वादळ’?
या अंधाऱ्या राजकारणात प्रशांत दादा जगताप आणि युवा धडाडीचे नेते मोहसीन शेख यांनी काँग्रेसचा पंजा उंचावून परिवर्तनाची हाक दिली आहे. तसलीम हसन शेख, आसिया मणियार, काशिफ सय्यद आणि तैहझीब सिद्दिकी या नव्या दमाच्या उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांकडे पाहिलं की लक्षात येतं, कोंढव्याचा मूड बदलला आहे. मिठानगरपासून ते भाग्यदेनगरपर्यंत आज फक्त ‘काँग्रेस’ नावाचा जल्लोष ऐकू येतोय.
मतदारांचा इशारा: “सावध ऐका फुढल्या हाका..!”
“घड्याळ आणि तुतारी एकच आहे असं म्हणून अजितदादांनी आमचा विश्वासघात केला आहे. सत्तेसाठी जातीयवादी शक्तींच्या मांडीवर बसणाऱ्यांना आम्ही १५ जानेवारीला त्यांची जागा दाखवू. हा लढा केवळ प्रभागाचा नाही, तर देशाच्या अखंडतेचा आहे!” — कोंढव्यातील एक संतप्त मतदार
सावधान कोंढवेकरांनो.! जो आपल्या देशाच्या अखंडतेशी खेळतो, जो जातीवादाचे विष पेरतो आणि जो स्वतःचे पाप लपवण्यासाठी भाजपाच्या वळचणीला जाऊन बसतो, असा उमेदवार तुमचा नातेवाईक असला तरी त्याला थारा देऊ नका. १५ जानेवारीला तुमचं एक मत ठरवेल की तुमची पुढची पिढी सुरक्षित राहणार की उद्ध्वस्त होणार. गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी कोंढव्याचा हा ‘पंजा’ सज्ज झाला आहे!


























