कष्टाच्या मातीतून आकाशाला गवसणी घालणारे ‘आदर्श पैलवान’ काळाच्या पडद्याआड! बाळासो फडतारे यांच्या निधनाने घोसरवाडवर शोककळा


कष्टाच्या मातीतून आकाशाला गवसणी घालणारे ‘आदर्श पैलवान’ काळाच्या पडद्याआड! बाळासो फडतारे यांच्या निधनाने घोसरवाडवर शोककळा

घोसरवाड  : लाल मातीचा कस, मनगटातली ताकद आणि काळजातली माणुसकी असा त्रिवेणी संगम असलेले घोसरवाडचे आदरणीय व रांगडे पैलवान आज अचानक काळाच्या पडद्याआड गेले! पैलवान बाळासो फडतारे यांचे निधन म्हणजे केवळ एका व्यक्तीची ताटातूट नाही, तर हाडाच्या कष्टकऱ्याचा, माणसांना आपलंसं करणाऱ्या एका भक्कम छत्रछायेचा अंत आहे. गरिबी आणि कष्टाच्या आखाड्यात आयुष्यभर दोन हात करत त्यांनी स्वतःचे जीवन घडवले; परंतु या संघर्षात त्यांनी कधी मानाने जगण्याचा आणि दुसऱ्याला जपण्याचा संस्कार सोडला नाही.

घोसरवाडच्या मातीत घाम गाळून तयार झालेले हे पैलवान केवळ कुस्तीच्या फडापुरते मर्यादित नव्हते. समाजाच्या भल्यामोठ्या आखाड्यात कुणीही अडचणीत असो, बाळासो त्यांच्या पाठीशी खंबीर आधार बनून उभे राहायचे. स्वतः हालअपेष्टा सहन करायच्या, सतत कष्टाच्या घामात न्हाऊन निघायचे, पण ओठावरचे हसू आणि चेहऱ्यावरचे समाधान त्यांनी कधी कमी होऊ दिले नाही — असा एक विर्मळ, आदर्शाचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या जगण्यातून घालून दिला. रितीरिवाज, जिव्हाळा आणि माणसांना जोडण्याची कला त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळली. आमच्यासारख्या कित्येक नवख्यांना मार्गदर्शनाचा दीपस्तंभ दाखवणारे हे महान व्यक्तिमत्त्व आज अचानक निघून गेल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.

“पैलवान, तुमचे जाणे काळजाला पाझर फोडणारे आहे! आपण दिलेली कष्टाची अन् स्वाभिमानाची प्रेरणा हीच आता आमच्या उर्वरित आयुष्याची पुंजी असेल.” अशा शब्दांत साप्ताहिक ‘ग्रामदैवत’चे संपादक विजय फडतारे यांनी आपल्या अश्रूढाल भावनांना वाट करून दिली. बाळासो फडतारे यांच्या जाण्याने घोसरवाडने एक सच्चा मार्गदर्शक अन् मोठ्या मनाचा माणूस गमावला आहे.

 


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!