पुणे: विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या दोन आरोपींना जामीन मंजूर; ॲड. अजिंक्य उडापे यांचा प्रभावी युक्तीवाद
पुणे: फुरसुंगी परिसरात विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना मे. न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. अजिंक्य उडापे आणि ॲड. निरज बाविस्कर यांनी मांडलेला प्रभावी आणि कायदेशीर युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध आर्म्स ॲक्ट कलम ३ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या अटकेनंतर आरोपींच्या वतीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.
सुनावणी दरम्यान, आरोपींचे वकील ॲड. अजिंक्य उडापे आणि ॲड. निरज बाविस्कर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे लक्ष वेधले. प्रथमदर्शनी संबंधित हत्याराबाबत आरोपींविरुद्ध कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. युक्तीवाद करताना त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचे दाखले देऊन कायदेशीर बाजू भक्कमपणे मांडली.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, मे. न्यायालयाने ॲड. अजिंक्य उडापे आणि ॲड. निरज बाविस्कर यांचा सुसंगत युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपींना जामीन मंजूर केला. या निकालामुळे पुणे कायदेतज्ज्ञ वर्तुळात ॲड. अजिंक्य उडापे यांच्या कायदेशीर कौशल्याची चर्चा होत आहे.


























