पुण्यात पहाटे काळजाचा थरकाप! कोंढव्यात भरधाव दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू


पुण्यात पहाटे काळजाचा थरकाप! कोंढव्यात भरधाव दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

कोंढवा, पुणे | प्रतिनिधी :

पुण्यातील कोंढवा परिसरात आज पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास भरधाव दुचाकी वाहनाच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुचाकी वाहन अतिवेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा गंभीर अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की संबंधित व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे तसेच अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन व वेगमर्यादेचे महत्त्व अधोरेखित केले असून, अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!