संकटात धैर्य आणि बुद्धीचा अपुरा शोध…


संकटात धैर्य आणि बुद्धीचा अपुरा शोध…

प्रेस मीडिया लाईव्ह

एकदा एक कुटुंबप्रमुख आपल्या पिल्लांसह स्वतःच्याच चुकीमुळे एका खोल विहिरीत पडला. विहिरीत पाणी कमी असल्यामुळे सुरुवातीला त्याला बाहेर पडण्याची आशा होती. मात्र हळूहळू विहिरीतील पाण्याची पातळी वाढू लागली आणि पिल्ले घाबरली. कुटुंब प्रमुखाने पिल्लांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडेना. पाणी कुटुंबप्रमुखाच्या छातीपर्यंत आले आणि परिस्थिती अधिक गंभीर झाली. शेवटी त्याने आपल्या पिल्लांना पायाखाली उभे केले आणि त्यांच्या डोक्यावर पाय ठेवला. पिल्लांच्या आधारावर त्याने आपले शरीर वर उचलले आणि विहिरीच्या काठावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. कुटुंबप्रमुख आपला जीव वाचवण्यासाठी पिल्लांचाच आधार घेत आहे, हे पाहून पिल्लेही शांत राहिली. या प्रसंगातून संकटाच्या वेळी माणूसही कधी कधी कठोर निर्णय घेतो, हे दिसून येते. संकटात घाबरून न जाता बुद्धी, धैर्य आणि योग्य मार्गाचा आधार घेतला पाहिजे. ही झाली प्रबोधन पर गोष्ट.

परंतु सध्याच्या व्यवस्थांकडे पाहिल्यास याची काही उदाहरणे सापडतील. उच्च शिक्षण व्यवस्था हे एक उदाहरण पाहिल्यास पुढील काही बाबी निदर्शनास येतील. विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण हे समाज निर्मितीचे केंद्र असते. तरुण वयात उच्च शिक्षण वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये असते या तीन पाच वर्षांमध्ये त्यांच्यावर जे संस्कार होतात किंवा या गोष्टी ऐकावयास पहावयास मिळतात त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यभर राहत असतो.

अपूर्ण…. काम चालू आहे.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!