पीडितांच्या आवाजाला नवे बळ: राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या मराठवाडा संघटकपदी जैनोदीन पटेल


पीडितांच्या आवाजाला नवे बळ: राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या मराठवाडा संघटकपदी जैनोदीन पटेल.

नांदेड: सामाजिक बांधिलकी आणि सातत्यपूर्ण लोकसेवेचा वसा जपणाऱ्या उपक्रमांतून राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या संघटन बांधणीला आता नवा वेग मिळणार आहे. सामाजिक कार्यकर्ते जैनोदीन पटेल रावणगावकर यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या मराठवाडा संघटकपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.

मागील तीन दशकांपासून मुखेड तालुक्यासह नांदेड जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रात पीडित, शोषित आणि धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर पत्रकारिता तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून रावणगावकर यांनी अतिशय निष्ठेने कार्य केले आहे. त्यांच्या याच दीर्घकालीन योगदानाची आणि उल्लेखनीय समाजकार्याची दखल घेत, परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली.

नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्नेहल बैठकीत मराठवाडा अध्यक्ष अब्दुल माजीद बशीर सर यांच्या शुभहस्ते रावणगावकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

> “मराठवाड्यातील ग्रामीण व शहरी भागातील अल्पसंख्याक, वंचित आणि दिन-दुबळ्या घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक व मूलभूत समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी अहोरात्र कटिबद्ध राहीन,” असा मनोदय जैनोदीन पटेल रावणगावकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

या प्रसंगी संपादक अल्ताफ सानी सर, प्रा. जुबेर खान सर, डॉ. हाकिमखान सर, शेखर पापुलवार, एम. अझरोद्दीन, शेख दाऊद, जिल्हा अध्यक्ष महेताबभाई यांसह परिषदेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवडीचे वृत्त समजताच विविध क्षेत्रांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, **Press Media Live** चे संपादक महेबुबभाई (पुणे), पंडितभाऊ दाभाडे, सखाराम जाधव सर (कोल्हापूर), अकबरभाई (बीड), मुनिरखान पठाण (लातूर), करामतखाँ पठाण (परभणी), शेख युनुस भाई (छ. संभाजीनगर), युसूफ भाई (हिंगोली), शफिक भाई (जालना), शिवशंकर पाटील कलंबरकर, आशद बल्की, ॲड. अस्लम शेख, गौसभाई सलगरकर, जलील पठाण, मोतीपाशा पाळेकर, सरपंच मन्नूभाई येवतीकर, इम्रान अत्तार, जयभीम सोनकांबळे व सादिकभाई बारहाळीकर आदी मान्यवरांनी रावणगावकर यांना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!