दोन विश्वविक्रमांनंतर आता ‘शॉर्ट फिल्म’चा धमाका; पुण्यात ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ची नवी क्रांती!


दोन विश्वविक्रमांनंतर आता ‘शॉर्ट फिल्म’चा धमाका; पुण्यात ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ची नवी क्रांती!

पुणे : अहो, ज्यांच्या रक्तामध्येच सामाजिक प्रश्नांची धग आहे आणि ज्यांच्या लेखणीत अन्यायाविरुद्ध लढण्याची आग आहे, ती संस्था शांत कशी बसेल? पुण्याच्या पत्रकारितेत आपल्या वेगळ्या शैलीचा ठसा उमटवणारी आणि चक्क दोन वेळा ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरणारी ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ ही वृत्तसंस्था आता एका नव्या क्रांतीला जन्म देत आहे!

शब्दांच्या पलीकडे… आता जिवंत चित्र!

पुण्याच्या या अग्रगण्य वृत्तसंस्थेने नुकताच एक असा ‘धमाका’ केला आहे, ज्यामुळे सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बातम्यांच्या जगात जागतिक कीर्ती मिळवल्यानंतर, आता ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने आपला मोर्चा थेट ‘शॉर्ट फिल्म’कडे वळवला आहे. अहो, ही फिल्म म्हणजे केवळ कॅमेरा फिरवून केलेली करमणूक नव्हे, तर तो समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा एक ‘सामाजिक एल्गार’ असणार आहे!

युद्धाची तयारी सुरू!

“जेव्हा शब्द अपुरे पडतात, तेव्हा चित्रांना बोलतं करावं लागतं,” याच विचारातून आगामी वर्षात एका ज्वलंत सामाजिक विषयावर लघुपट तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या फिल्मची तयारी आतापासूनच युद्धपातळीवर सुरू झाली आहे. संहितेपासून ते सादरीकरणापर्यंत प्रत्येक गोष्ट ही ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या ब्रँडप्रमाणेच दर्जेदार आणि परिणामकारक असावी, याकडे मुख्य संपादकांचा विशेष कटाक्ष आहे. ज्यांनी हजारो प्रेक्षकांचा आकडा गाठून जागतिक विक्रम केला, ती संस्था आता चित्रपट सृष्टीत काय चमत्कार घडवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसहभागाची साथ!

सामाजिक परिवर्तनाचा हा लढा केवळ एका संस्थेचा राहिला नसून, ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या या विशेष कार्यासाठी समाजातील विविध क्षेत्रांतील अनेकांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. या व्यापक पाठिंब्यामुळे या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहे.

लोकशाहीचा बुलंद आवाज!

पत्रकारितेच्या मैदानात दोन ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ मारल्यानंतर आणि आता सामाजिक विषयावर शॉर्ट फिल्मची घोषणा केल्यानंतर, लोकशाहीचा बुलंद आवाज असलेल्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे सर्वच स्तरातून भरभरून अभिनंदन करण्यात येत आहे. ही नवी क्रांती समाजातील सडलेल्या व्यवस्थेला नक्कीच चपराक देईल आणि समाजप्रबोधनाची एक नवी दिशा दाखवेल, यात शंका नाही !

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!