निवडणूक आयोगाने भारतीय संशोधकाचे दोन वेळा नामकरण केले…


निवडणूक आयोगाने भारतीय संशोधकाचे दोन वेळा नामकरण केले…

प्रेस मीडिया लाईव्ह

निवडणूक आयोगाने पुण्यातील निवडणूक विषयाचे अभ्यासक असलेल्या संशोधकाशी निवडणूक प्रशासकीय सुधारणांविषयी पत्रव्यवहार करताना त्या संशोधकाचे मूळ नाव बदलून पत्रव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात या संशोधकाने मा. मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली यांना पत्रव्यवहार केला आहे. या पत्र व्यवहारांमध्ये खालील गोष्टी नमूद केल्या आहेत.

मा. मुख्य निवडणूक आयुक्त, भारत निवडणूक आयोग,नवी दिल्ली.

विषय : भारत निवडणूक आयोगाकडून माझ्या नावाची चुकीची नोंद करण्यात आल्याबाबत चौकशी करून योग्य कारवाई करण्याबाबत विनंती.

संदर्भ : ECI/PGRS ई-मेल दिनांक 20/04/2024 व 30/10/2024

महोदय,

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी पाठविलेल्या दिनांक 20 एप्रिल 2024 व 30 ऑक्टोबर 2024 च्या ई-मेल/पत्राची कृपया पडताळणी करावी. सदर पत्रव्यवहारामध्ये आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माझे नाव “M. Vasu” असे नमूद केले आहे, माझे योग्य नाव “डॉ. तुषार निकाळजे” असे आहे. या गंभीर चुकीची चौकशी करण्यात यावी तसेच या त्रुटीस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी माझी नम्र विनंती आहे. मी भारत निवडणूक आयोगाशी केलेल्या सर्व पत्रव्यवहारात माझे नाव सातत्याने “डॉ. तुषार निकाळजे” असेच नमूद केले आहे. आजपर्यंत माझा भारत निवडणूक आयोगाशी सुमारे 25 वेळा पत्रव्यवहार झाला असून बहुतांश वेळा आयोगाने माझे नाव योग्य प्रकारे नमूद केले आहे. तथापि, दिनांक 20 एप्रिल 2024 च्या ई-मेलमध्ये माझे नाव “M. Vasu” असे चुकीचे नोंदविण्यात आले. त्यानंतर दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पत्रात माझे वेगळेच नाव नमूद करण्यात आले. म्हणजेच, एकाच व्यक्तीसाठी तीन वेगवेगळी व पूर्णपणे असंबंधित नावे वापरण्यात आली आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

मतदार यादी पुनरावलोकन अथवा निवडणूक प्रक्रियेतील कामकाजादरम्यान चुका आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी व शिस्तभंगात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे माझ्या नावासंदर्भात झालेल्या या गंभीर त्रुटीबाबतही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

पश्चिम बंगालमध्ये विशेष सघन पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेदरम्यान झालेल्या त्रुटींमुळे काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. त्याचप्रमाणे पुणे, महाराष्ट्र येथे निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित राहिलेल्या एका महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच नवी मुंबई येथे निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित राहिलेल्या सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिस कारवाईचे निर्देश देण्यात आल्याचेही वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या प्रकरणातही समान व न्याय्य निकष लागू करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

यासोबतच माझ्याबाबतची काही माहिती नोंदवू इच्छितो. मी भारतीय निवडणूक व्यवस्थेचा संशोधक व अभ्यासक असून या विषयावर मी पीएच.डी. संशोधन पूर्ण केले आहे. माझ्या या विषयावरील दोन पुस्तकांना नऊ विद्यापीठांनी अभ्यासक्रमासाठी मान्यता दिली आहे. माझ्या संशोधनकार्याच्या आधारे मला चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच भारतातील विविध राज्यांकडून पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सन 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मला एका समितीवर निवडणूक तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले होते. तसेच मी सुमारे ₹1.5 कोटी मूल्य असलेले एक प्रशासकीय पेटंट निवडणूक आयोगाला विनामूल्य वापरण्यास दिले आहे. या पेटंटची अंमलबजावणी झाल्यास सुमारे 58 लाख निवडणूक कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी 35 मिनिटांचा वेळ वाचू शकतो आणि निवडणूक व्यवस्थापनावरील प्रशासकीय भारही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

सदर प्रकरण केवळ शब्दलेखनाच्या चुकीपुरते मर्यादित नाही. “डॉ. तुषार निकाळजे” या नावाऐवजी आयोगाने “M. Vasu” आणि इतर पूर्णपणे वेगळ्या व्यक्तींची नावे वापरून माझ्याशी पत्रव्यवहार केला आहे. अशा प्रकारची चूक अभिलेख व्यवस्थापन व अधिकृत पत्रव्यवहाराच्या अचूकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर व योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही नम्र विनंती.

कृपया नोंद घ्यावी की, एखाद्या मतदाराच्या/व्यक्तीच्या नावाच्या तीन वेगवेगळ्या नोंदी आढळल्यास, अशा मतदाराला दुबार (Duplicate) किंवा बनावट (Bogus) मतदार मानले जाते.

आपला विश्वासू,

डॉ. तुषार निकाळजे


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

44
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!