पुण्यातील माजी नगरसेवक सह भाजप राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेत …


पुण्यातील माजी नगरसेवक सह भाजप राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेत …

 

पुणे मनपा माजी नगरसेवक सुनील गोगले यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे हस्ते शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. तसेच भाजप माथाडी पुणे शहर उपाध्यक्ष अक्षय भोसले, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक, मातंग आघाडीच्या आरतीताई मिसाळ, क्रांतिवीर झोपडपट्टी संघटना संस्थापक अध्यक्ष राजेश परदेशी, राष्ट्रवादी युवकचे श्रवण केकाण यासर्वांनीही शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी संपर्कप्रमुख आ सचिनभाऊ अहिर, निवडणूक समन्वयक वसंत मोरे पुणे शहरप्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे उपशहर प्रमुख आबा निकम विभाग प्रमुख राहुल जेकटे अजय परदेशी सोमनाथ गायकवाड शशिकांत साठोटे रेवण सूळ विकी धोत्रे उपस्थित होते.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!