# इचलकरंजीत जागतिक योग दिन उत्साहात साजरा; प्रबोधिनी आणि पतंजली योग समितीचा संयुक्त उपक्रम


# इचलकरंजीत जागतिक योग दिन उत्साहात साजरा; प्रबोधिनी आणि पतंजली योग समितीचा संयुक्त उपक्रम

इचलकरंजी : शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी योगासन ही काळाची गरज बनली आहे, हा संदेश देत इचलकरंजी येथे जागतिक योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. येथील समाजवादी प्रबोधिनी, प्रबोधन वाचनालय आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रवेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रसिद्ध योगशिक्षक विजय पवार यांनी मानवी जीवनात योगासनाचे असणारे महत्त्व पटवून दिले. “आजच्या धकाधकीच्या युगात निरोगी आरोग्यासाठी नियमित योगासने करणे आवश्यक आहे. योगामुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते,” असे अनेक उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले. केवळ व्याख्यान न घेता, पवार यांनी उपस्थितांकडून विविध योगासनांची प्रात्यक्षिकेही करून घेतली.

या योग साधना शिबिरात शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये ज्योती रेवणकर, शारदा जासू, शोभा पाटील, प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, अशोक केसरकर, दयानंद लिपारे, शकील मुल्ला, पांडुरंग पिसे आणि नारायण लोटके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्राणायाम आणि विविध आसनांचा सराव करत आरोग्याचा संकल्प केला.

प्रबोधिनीच्या सभागृहात पार पडलेल्या या उपक्रमाचे इचलकरंजीच्या सामाजिक व सांस्कृतिक वर्तुळात कौतुक होत आहे.

 

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!