ठाण्यात ‘लक्ष्मी’ प्रसन्न ; पण साहेबिणीला ‘एसीबी’चे दर्शन ! अडीच लाखांच्या लाचेसह महिला उपसंचालिका गजाआड!


 कोकण विभाग अनुसूचित जमाती तपासणी समितीच्या कार्यालयात ‘एसीबी’चा मोठा धमाका !

सुनील पाटील :

सरकारी खुर्चीवर बसून सामान्यांच्या अडवणुकीचे दुकान थाटणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठा दणका दिला आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणीची फाईल मंजूर करण्यासाठी चक्क अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना कोकण विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या उपसंचालिका मिनाक्षी नारायण उन्हाळे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?

तक्रारदाराने आपल्या पत्नी आणि मुलीच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी या कार्यालयात अर्ज केला होता. ही फाईल नियमानुसार मंजूर करणे हे संबंधित अधिकाऱ्याचे कर्तव्य होते. मात्र, उपसंचालक उन्हाळे यांनी ही फाईल क्लिअर करण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली. लाचेची ही मागणी मान्य नसल्याने तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड-अलिबाग कार्यालयाकडे १२ फेब्रुवारी रोजी तक्रार केली होती.

असा रचला सापळा…

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर १३ फेब्रुवारीला लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ठाणे ‘एसीबी’च्या पथकाने शुक्रवारी (१३ मार्च) चरई येथील एमटीएनएल इमारतीत असलेल्या कार्यालयात सापळा रचला. सायंकाळी ४:१० वाजण्याच्या सुमारास, आपल्याच केबिनमध्ये तक्रारदाराकडून अडीच लाखांची रक्कम स्वीकारताना मिनाक्षी उन्हाळे यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.

कारवाईचे पथक:

ही धडाकेबाज कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या पथकाने केली आहे. सध्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नागरिकांना आवाहन: कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

 

 

 

 


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!