व्यसनाचा चिखल सोडा, सन्मानाचा टिळा लावा..! ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ची हाक: नशा सोडा, देश जोडा..!


व्यसनाचा चिखल सोडा, सन्मानाचा टिळा लावा..! ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ची हाक: नशा सोडा, देश जोडा..!

लेखक: ज्येष्ट संपादक मेहबूब सर्जेखान :

“अरे, ज्या हातांनी या सह्याद्रीचे कडे फोडले, ज्या मनगटांनी इतिहासाची पानं लिहिली, ती तरुण मनगटं आज नशेच्या बाटलीत बुडताना पाहून काळजाचं पाणी-पाणी होतंय! नशा काय करताय? नशा करायचीच असेल, तर ती कर्तृत्वाची करा, प्रगतीची करा, मायभूमीच्या सेवेची करा!”

नमस्कार! आजचा काळ मोठा विचित्र आला आहे. ज्या हातांनी या देशाचे भविष्य घडवायचे, त्या हातांत आज ‘पेल्या’चा चषक किंवा अंमली पदार्थांची पुडी दिसावी, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते? तरुण पिढी म्हणजे या राष्ट्राचा कणा! पण आज हा कणाच नशेच्या घोरपडीने पोखरून काढला आहे. ही घोरपड एकदा का विळखा घालते, की माणसाचे आयुष्य, त्याचे स्वप्न आणि त्याचे घरदार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही.

पण आता या अंधारात एक नवा सूर्य उगवतोय. ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ ने पुकारलेला हा एल्गार आहे. ज्या तरुणांनी नशिबाला आणि परिस्थितीला दोष देत हात टेकले आहेत, त्यांना आमचा एकच रोकडा सवाल आहे— अरे, किती दिवस आपल्याच नाशावर अश्रू ढाळणार? आता व्यसनापायी रडायचं नाही, तर व्यसनाविरुद्ध लढायचं!

व्यसनाची घोरपड आणि उद्ध्वस्त संसार

नशा ही केवळ एका माणसाला मारत नाही, तर ती अख्ख्या संसाराची राखरांगोळी करते. ज्या घरात कर्ता पुरुष नशेच्या आहारी जातो, तिथे लक्ष्मी पाणी भरत नाही तर डोळ्यांतून पाणी वाहते! लेकरांच्या तोंडचा घास हिरावला जातो आणि सुखी संसाराचा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळतो. ही भयावह परिस्थिती बदलण्यासाठी केवळ उपदेशाचे डोस पाजून चालणार नाही, तर या युवकांना त्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मायेचा आणि सन्मानाचा हात हवा आहे.

अभियानाचा अजोड उद्देश

‘प्रेस मीडिया लाईव्ह’ने जे व्रत हाती घेतले आहे, ते पाहून माझे मन हरखून गेले. त्यांचे उद्देश बघा किती टोकदार आणि स्पष्ट आहेत:

नशेत घोरपडलेल्या युवकांना मुक्त कर णे: जे युवक या विळख्यात अडकले आहेत, त्यांना बाहेर काढून पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे.

सन्मानाचा टिळा लावणे : केवळ व्यसन सोडवणे पुरेसे नाही, तर त्यांनी केलेल्या या संघर्षाचा ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ तर्फे जाहीर सन्मान करणे! समाजाला हे सांगणे की, ‘हा माणूस काल हरला होता, पण आज जिद्दीने उभा आहे.’

उद्ध्वस्त संसार सावरणे : तुटलेली नाती जोडणे आणि कोमेजलेली घरे पुन्हा फुलवणे, हाच या अभियानाचा खरा आत्मा आहे.

आता वेळ आली आहे..!

आमच्या देशात घोषणा खूप होतात, पण कृती हवी असते. ‘व्यसनमुक्त भारत’ ही केवळ ओळीतली वाक्ये राहू नयेत, तर ती घराघरांत पोहोचलेली चळवळ व्हावी. जेव्हा एक तरुण नशेची बाटली फेकून देऊन हातात कष्टाचे साधन घेतो, तेव्हा खऱ्या अर्थाने भारत बलशाली होतो.

प्रेस मीडिया लाईव्हच्या या वाघांना माझा कडकडीत सलाम! तुम्ही सन्मानाचा जो घाट घातला आहे, तो पाहून अनेक भरकटलेले जीव पुन्हा मार्गावर येतील. लक्षात ठेवा, व्यसनाचा चिखल झटकून जो उभा राहतो, तोच खरा ‘वीर’ आणि त्याचाच व्हायला हवा ‘जयजयकार’!

 

नशा सोडा… देश जोडा!

– तुमचाच, प्रेस मीडिया लाईव्ह 

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!