पुणे महानगरपालिका निवडणूक: कोंढवा खुर्द-कौसर बाग प्रभागात काँग्रेसची ‘विजयाची वज्रमूठ’; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


पुणे महानगरपालिका निवडणूक: कोंढवा खुर्द-कौसर बाग प्रभागात काँग्रेसची ‘विजयाची वज्रमूठ’; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

पुणे: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आणि संविधानाच्या रक्षणाचा निर्धार घेऊन, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरला आहे. प्रभाग क्र. १९ (कोंढवा खुर्द–कौसर बाग) मध्ये काँग्रेसने सुशिक्षित आणि जनसंपर्क असलेल्या चार सक्षम उमेदवारांची मोट बांधली असून, या ‘टीम काँग्रेस’ला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकशाही आणि विकासाचा निर्धार

संविधान, समता आणि विकास’ हे सूत्र घेऊन काँग्रेसने या प्रभागात आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत:

प्रभाग १९ ‘अ’: तस्लीम हसन शेख

प्रभाग १९ ‘ब’: आसिया मनीयर

प्रभाग १९ ‘क’: काशिफ फक्रुल्ला सय्यद

प्रभाग १९ ‘ड’: तहेजीब मोइनुद्दीन सिद्दीकी

जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित

प्रभागातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर ही टीम काम करणार आहे. “केवळ आश्वासनं नको, तर प्रत्यक्ष कृती आणि सर्वसमावेशक विकास” ही भूमिका घेत उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. लोकशाही मूल्यांचे जतन आणि जनतेच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्व म्हणून या चारही उमेदवारांकडे पहिले जात आहे.

“आमची टीम ही केवळ राजकारणासाठी नाही, तर कोंढवा-कौसर बाग परिसरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे,” अशी भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

मतदानाचे आवाहन

येत्या गुरुवारी, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटण दाबून काँग्रेसच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

थोडक्यात माहिती:

प्रभाग: १९ (कोंढवा खुर्द–कौसर बाग)

पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

चिन्ह: हाताचा पंजा

मतदान दिनांक: १५/०१/२०२६

 

 

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!