‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या कायदेशीर सल्लागारपदी पुण्याचे ख्यातनाम वकील ॲड. साजिद बी. शाह यांची निवड !

इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हॅट्रिक करणाऱ्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चा मोठा निर्णय; मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्याकडून घोषणा
पुणे : पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील आघाडीची आणि नामांकित वृत्तसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ (न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनेल) च्या कायदेशीर सल्लागारपदी पुण्याचे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर ॲड. साजिद बी. शाह यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे मुख्य संपादक व संस्थापक मेहबूब सर्जेखान यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
‘प्रेस मीडिया लाईव्ह’ने अत्यंत कमी कालावधीत पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला असून, नुकतीच ‘इंटरनॅशनल बुक ऑफ…”वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये सलग तीन वेळा (हॅट्रिक) नोंद करून जागतिक पातळीवर सुवर्णयश संपादन केले आहे. डिजिटल मीडिया क्षेत्रात पारदर्शकता, निर्भीड पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी जपत या वृत्तसंस्थेने मोठी घोडदौड सुरू ठेवली आहे. हीच विश्वासार्हता आणि कायदेशीर बाजू अधिक मजबूत करण्यासाठी पुण्याच्या विधी क्षेत्रात आपल्या कौशल्याचा दबदबा निर्माण करणारे निष्णात फौजदारी वकील ॲड. साजिद बी. शाह यांची कायदेशीर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.
ॲड. साजिद बी. शाह यांना क्रिमिनल लॉ संदर्भातील प्रदीर्घ अनुभव असून, कायद्यातील विविध क्लिष्ट बाबींवर त्यांची उत्तम पकड आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना कायदेशीर पाठबळ मिळेल, तसेच संस्थेच्या भावी प्रकल्पांना आणि सामाजिक उपक्रमांना कायदेशीर दृष्ट्या योग्य दिशा लाभेल, असा विश्वास मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, ॲड. साजिद बी. शाह यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल विधी क्षेत्र, पत्रकारिता, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, सर्वच स्तरातून त्यांचे उत्स्फूर्त अभिनंदन करण्यात येत आहे.































