कवठेएकंद येथील निवृत्त सैनिक रमजान कलावंत यांचे आकस्मिक निधन; गावात शोककळा

कवठेएकंद येथील निवृत्त सैनिक रमजान कलावंत यांचे आकस्मिक निधन; गावात शोककळा

कवठेएकंद : येथील रहिवासी आणि भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक रमजान कलावंत (वय ७०) यांचे काल दुपारी ४ वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण कवठेएकंद गावावर शोककळा पसरली आहे. 

अश्रूभ्रपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

स्व. रमजान कलावंत यांच्या पार्थिवावर काल रात्री ११ वाजता कवठेएकंद येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला. यावेळी गावातील नागरिक, आजी-माजी सैनिक आणि विविध स्तरांतील मान्यवर प्रचंड संख्येने उपस्थित होते. एका शिस्तप्रिय आणि मनमिळावू व्यक्तिमत्वाला गाव मुकल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मोठा परिवार

त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. सैन्य दलातील निवृत्तीनंतर त्यांनी आपले जीवन सामाजिक आणि कौटुंबिक कार्यासाठी समर्पित केले होते.

उद्या ‘जारत’ विधी

स्व. रमजान कलावंत यांच्या निधना निमित्त होणारा धार्मिक ‘जारत’ विधी उद्या सकाळी १० वाजता पार पडणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी कळवले आहे.

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!