पीएम ई-बस स्थानकाचे काम वेगाने प्रगतीपथावर – उमाकांत दाभोळे यांच्या पाठपुराव्याला यश

इचलकरंजी शहरातील पीएम ई-बस स्थानकाच्या बांधकामाला आता वेग प्राप्त झाला असून हे काम अत्यंत संघटित पद्धतीने सुरू आहे. केंद्र सरकारच्या “पीएम ई-बस सेवा” या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत शहरात सिटी ई-बस सेवा सुरू होणार आहे. शहरातील सोलगे मळा परिसरात जागा बस स्थानकासाठी निश्चित करण्यात आली असून, चार्जिंग स्टेशन व प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उभारल्या जात आहेत.
सुमारे पाच कोटी दहा लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा कामादेश १४ ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आला होता. प्रारंभी प्रशासनाकडील काही तांत्रिक अडचणीं व दुर्लक्ष पणामुळे कामाला मंद गती होती. मात्र भाजपाचे शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन कामांना गती मिळावी अशी मागणी केली होती. त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत ठेकेदार आणि प्रशासनाशी संवाद साधला. परिणामी आता बांधकामातील कंपाउंड भिंत, पायाभूत रचना आणि स्टेशनचा आराखडा पूर्णत्वाकडे जात आहे.
ठेकेदाराला देण्यात आलेल्या कार्यादेशानुसार बारा महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण करायचे असून, अपेक्षित वेळेत प्रकल्प पूर्ण होईल अशी शक्यता आहे. शासननियुक्त ठेकेदारामार्फत बससेवा चालवली जाणार असून चालक आणि कर्मचारी महानगरपालिकेकडून उपलब्ध केले या साठीची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच पूर्ण होईल
या कामाला गती देण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रे आणि डिजिटल प्रसारमाध्यमांचेही मोठे सहकार्य लाभले, असे दाभोळे यांनी नमूद केले. माध्यमांच्या सातत्यपूर्ण बातम्या, जनजागृती आणि सकारात्मक पाठपुराव्यामुळे प्रशासन हलले आणि प्रकल्पाला आवश्यक गती मिळाली, असेही ते म्हणाले
शहराच्या वाहतुकीस नवे स्वरूप देणारा हा प्रकल्प नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास उमाकांत दाभोळे यांनी व्यक्त करून प्रशासनाला काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले.






























