बोपोडीच्या रणमैदानात शकिला मुल्ला यांची ‘डरकाळी’; विरोधकांच्या काळजात धडकी!


बोपोडीच्या रणमैदानात शकिला मुल्ला यांची ‘डरकाळी’; विरोधकांच्या काळजात धडकी!

 

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा शंखनाद झाला असून, बोपोडीच्या प्रभाग क्रमांक ८ ‘ब’ मध्ये सध्या राजकीय ‘नवलनाट्य’ पाहायला मिळत आहे. या प्रभागातील अपक्ष ओबीसी महिला उमेदवार सौ. शकिला फिरोज मुल्ला यांनी निवडणुकीच्या रिंगणात अशा काही जोमाने उडी घेतली आहे की, प्रस्थापित राजकीय गड्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला आहे!

विरोधकांच्या झोपा उडवणारी लाट.!

शकिला फिरोज मुल्ला या केवळ उमेदवार नाहीत, तर त्या एक ‘ज्वाला’ बनून या निवडणुकीत उतरल्या आहेत. ओबीसी महिला राखीव असलेल्या या प्रभागात त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करताच, सर्वच स्तरांतून त्यांना जो पाठिंबा मिळतोय, तो पाहून विरोधकांच्या गोटात अक्षरशः ‘सन्नाटा’ पसरला आहे. ज्यांना वाटत होतं की ही निवडणूक म्हणजे फक्त ‘राजकीय पिकनिक’ आहे, त्यांच्या आता ‘झोपा उडाल्या’ असून, रात्रीच्या वेळी त्यांना फक्त शकिला शेख यांच्या समर्थकांचा जयघोष ऐकू येतोय!

लोकशक्तीचा हुंकार..!

राजकारणातल्या जुन्या खोडांना.. आता घाम फुटला आहे. कारण, शकिला शेख यांच्या पाठीशी सामान्यांची वज्रमूठ उभी राहिली आहे. “सत्ता नाही, संपत्ती नाही, पण जनसेवेची जिद्द आहे,” अशा शब्दांत जेव्हा त्या मतदारांशी संवाद साधतात, तेव्हा समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकते. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे आता ‘उलटी-पालटी’ झाली आहेत.

प्रेस मीडिया लाईव्ह’चा रोखठोक सवाल :

प्रस्थापितांना आता भीती वाटतेय ती एकाच गोष्टीची – जर एखादी ‘अपक्ष’ महिला केवळ जनसामान्यांच्या बळावर महापालिकेत पोहोचली, तर मग यांच्या वर्षानुवर्षांच्या मक्तेदारीचं काय होणार? पण लक्षात ठेवा, पुण्याची जनता आता सुज्ञ झाली आहे. तिला आता केवळ घोषणा नकोत, तर कृती हवी आहे! प्रस्थापित राजकीय पक्ष आता या ‘अपक्ष’ वादळाला रोखण्यासाठी काय खेळी खेळतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल!

“बोपोडीच्या गल्लीबोळात आता परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. शकिला फिरोज मुल्ला यांनी मारलेली ही ‘डरकाळी’ आता केवळ ८ ‘ब’ पुरती मर्यादित नसून, संपूर्ण पुण्यात त्याची चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनो, सावधान! ही तर केवळ सुरुवात आहे!”

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!