व्यसनाच्या वणव्याला आता माणुसकीचा वेढा! हातकणंगलेच्या भूमीत ‘नशामुक्ती’चे भव्य रणशिंग!!


व्यसनाच्या वणव्याला आता माणुसकीचा वेढा! हातकणंगलेच्या भूमीत ‘नशामुक्ती’चे भव्य रणशिंग!!

हातकणंगले: विशेष प्रतिनिधी ज्या महाराष्ट्राच्या मातीला संतांनी संस्काराचे अमृत पाजले, त्याच मातीत आज व्यसनाधिनतेचे विष कालवले जात आहे. तरुण पिढी या नशेच्या विळख्यात होरपळून निघत असताना, केवळ कोरड्या गप्पा न मारता ‘कृती’चा हुंकार घुमला आहे तो म्हणजे हातकणंगले येथे! येथील नशामुक्ती केंद्राच्या भव्य उद्घाटन सोहळ्याने एका नव्या पर्वाची पहाट झाली असून, व्यसनी जीवनाच्या काळोखात आता आशेचा दिवा पेटला आहे!

व्यासपीठावर ‘कर्तृत्वाचा’ झगमगाट..!

या सोहळ्याचे सारथ्य करण्यासाठी आणि या महान कार्यात स्वतःची समिधा अर्पण करण्यासाठी अनेक दिग्गज उपस्थित होते. ज्यांच्या दूरदृष्टीने हा प्रकल्प आकाराला आला, ते आमचे मार्गदर्शक आणि संस्थापक सादिक शेख यांचा उत्साह म्हणजे एखाद्या तरुणालाही लाजवेल असा होता. त्यांच्या जोडीला या केंद्राची धुरा सांभाळणारे डायरेक्टर अस्लम शेख, खंबीर साथ देणारे सुहास पाटील आणि शिस्तप्रिय झोनल ऑफिसर अनिस जमादार यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक आगळीच उंची प्राप्त झाली होती.

विज्ञानाची दृष्टी आणि अनुभवाची शिदोरी

केवळ भाषणबाजीने व्यसन सुटत नसते, त्याला हवी असते वैद्यकीय दृष्टी! हीच उणीव भरून काढण्यासाठी डॉ. सलीम आळतेकर यांनी आपली उपस्थिती लावून या कार्याला शास्त्रीय आधार दिला. तसेच देशिंगे सर आणि सर्व आदरणीय झोनल ऑफिसर्स व पदाधिकारी यांनी ज्या तळमळीने या कार्यक्रमात सहभाग घेतला, ते पाहता या केंद्रातून केवळ नशामुक्त माणूसच नाही, तर एक सुसंस्कृत नागरिक बाहेर पडेल, याची आम्हाला खात्री पटली आहे.

“नशा ही माणसाला माणसातून उठवते, पण हे केंद्र माणसाला पुन्हा माणुसकीच्या जवळ नेईल!”

असा जणू मूक संदेशच या भव्य उद्घाटनातून हातकणंगलेच्या जनतेला मिळाला. सादिक शेख आणि त्यांच्या टीमने उचललेले हे पाऊल म्हणजे उद्याच्या सुदृढ महाराष्ट्राच्या उभारणीतील एक ‘माईलस्टोन’ ठरणार आहे, यात शंकाच नाही!

व्यसनाला करा हद्दपार, हातकणंगलेत सुरु झालाय माणुसकीचा दरबार!

 

 

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!