एका झंझावाताचा अंत..! नागरी बँकांचा ‘कणखर पालक’ हरपला ; पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनची भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे: महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे कणखर पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लि.’ च्या वतीने शनिवारी शिवाजीभाई ढमढेरे सभागृह येथे एका भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सहकार क्षेत्रातील या बुलंद आवाजाच्या निधनाने संपूर्ण बँकिंग क्षेत्र पोरके झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

प्रमुख आधारस्तंभ (पदाधिकारी)
शोकसभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. निलेश शिवाजीभाई ढमढेरे होते. दादांच्या स्मृतींना उजाळा देताना खालील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या:
श्री. निलेश शिवाजीराव ढमढेरे (अध्यक्ष)
श्री. रमेश शंकरराव वाणी (उपाध्यक्ष)
श्री. सुभाष विठ्ठलराव मोहिते (मानद सचिव)
सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
अजितदादांच्या शिस्तबद्ध कार्याला आणि सहकार चळवळीतील त्यांच्या योगदानाला वंदन करण्यासाठी असोसिएशनचे संपूर्ण संचालक मंडळ आणि विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते:
श्री. विद्याधर वामनराव अनासकर (संचालक)
श्री. विजय प्रकाशराव ढेरे (संचालक)
ॲड. श्री. भरत दशरथ टकले (संचालक)
डॉ. प्रिया प्रकाश महिंद्रे (संचालिका)
श्री. बाबुराव विठ्ठलराव शितोळे (संचालक)
श्री. प्रल्हाद भीमराव कोकरे (संचालक)
श्री. अनिल भरतशेठ गाडवे (संचालक)
श्री. दिनेश रमेश ओसवाल (संचालक)
श्री. जुगल किशोर रामगोपाल पुंगलिया (संचालक)
श्री. सय्यद मोहम्मद गौस शेर अहमद (संचालक)
श्री. कांतीलाल तुकाराम गुजर (संचालक)
श्री. वसंत आनंदराव लोंढे (संचालक)
श्री. मनन दिलीप शिंदे (संचालक)
श्री. बबन दिलीप शिंदे (संचालक)
श्री. राजेंद्र रामचंद्र कवडे (संचालक)
श्री. नंदकुमार विठोबा लांडे (संचालक)
श्री. श्रीकांत बाळासाहेब तिरडे (संचालक)
सौ. नंदा नारायण लोणकर (संचालिका)
श्री. गणेश जयवंतराव शेवाळे (संचालक)
सौ. लीना विद्याधर अनास्कर (तज्ज्ञ संचालिका)
श्री. युवराज दत्तात्रय वारघडे (तज्ज्ञ संचालक)
श्री. चंद्रकांत हनुमंतराव शेळके (मुख्य कार्यकारी अधिकारी)
ॲड. अय्युब शेख (व्हाईस चेअरमन, मुस्लिम को-ऑप बँक)
प्रशासकीय शिस्त आणि सहकाराचा आधारवड
शोकसभेत बोलताना मान्यवरांनी सांगितले की, अजितदादांनी नेहमीच नागरी सहकारी बँकांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली. त्यांच्या निधनाने सहकार चळवळीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. दादांच्या जाण्याने सहकाराचा एक ‘बुलंद आवाज’ हरपला असून, बँकिंग क्षेत्रातील प्रत्येक अडचणीत धावून जाणारा खंबीर लोकनेता आता आपल्यात नाही, अशी हळहळ यावेळी व्यक्त करण्यात आली.




























