बी.एड. महाविद्यालय अनुदानाविषयीच्या विषयावर अखिल भारतीय शैक्षिक महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रदीप खेडकर यांच्याशी चर्चा


बी.एड. महाविद्यालय अनुदानाविषयीच्या विषयावर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय सेक्रेटरी तथा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रदीप खेडकर यांच्याशी चर्चा 

दिनांक 28 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय सेक्रेटरी तथा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रदीप खेडकर सर यांच्यासोबत खूप चांगल्या रीतीने चर्चा झाली. चर्चेसाठी बी. एड. महाविद्यालयाचे शिष्टमंडळ उपस्थित होते. त्यामध्ये. राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या विभागीय उपाध्यक्षा डॉ. चौगुले- निर्मळे आर.एल. यांनी पुढाकार घेतला. त्यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बी. एड. महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. सुरुवातीपासून सदर प्रलंबित प्रश्नांची माहिती असलेले जेष्ठ प्राध्यापक यामध्ये प्रामुख्याने प्राचार्या खांडके मॅडम, प्राचार्या खामकर मॅडम,प्राचार्या डॉ शिंदे सर, रवींद्र पाटील, इत्यादी सीनियर व्यक्तींच्या बरोबर सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक ही उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठातील बॉटनी विभागांमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या दरम्यान प्रदीप खेडकर यांची भेट घेण्यात आली. बी.एड .महाविद्यालयाच्या अनुदानासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्व प्रयत्नांची मांडणी त्यांच्यासमोर करण्यात आली. त्यावर प्रमोद खेडकर यांनी या समस्येवरती मी पुढाकार घेईन असे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी बी. एड. महाविद्यालयातील सर्व शिष्टमंडळाला योग्य असे मार्गदर्शन केले. त्यांनी बी.एड. महाविद्यालयाच्या 2001 पूर्वीच्या सर्व महाविद्यालयांच्या स्थापनेपासूनच्या असणाऱ्या सर्व पुराव्यांची योग्य पाहणी करून जुळवाजुळव करण्यासाठी सांगितले. शासनाद्वारे दिलेली सर्व पत्रे, महाविद्यालयाच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे, तसेच आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांची सर्व कागदपत्रे या सर्वांची एकत्रित माहिती कलेक्ट करून त्याचा व्यवस्थित सर्व बी.एडच्या शिष्टमंडळाने अभ्यास करावा असा उपदेश केला. 2001 पूर्वीच्या महाविद्यालयांची अनुदान मागणी रास्त असून त्यावरती नक्कीच तोडगा निघेल अशी त्यांनी ग्वाही दिली. वैयक्तिक मी यासंदर्भात तुम्हाला मदत करेन अशी त्यांनी हमी घेतली. यापूर्वी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने विविध प्रश्न सोडवले आहेत त्यामध्ये एम फिल चा प्रश्न ,CAS बाबतचे प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. राष्ट्रीय शैक्षिक महासंघाद्वारे सोडवलेले/हाती घेतलेले प्रमुख प्रश्न पुढील प्रमाणे आहेत,

सेवांतर्गत प्रश्न: प्राध्यापकांची पदोन्नती (CAS – Career Advancement Scheme) प्रकरणेवेतन त्रुटीआणि सेवेतील सुरक्षितता,

पेन्शन व लाभ: जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करणे आणि सेवा निवृत्तीचे लाभ वेळेवर मिळवून देणे,

NEP २०२० अंमलबजावणी: नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाचे आणि समावेशकतेचे नियोजन,

सेवाशर्ती: उच्च शिक्षण संस्थेतील शिक्षकांसाठी भेदभाव-विरोधी धोरणे आणि कामाच्या ठिकाणच्या समस्यांचे निराकरण,

नेट/सेट-पीएच.डी. पात्रतेचे प्रश्न: विविध शैक्षणिक धोरणांमुळे निर्माण होणारे तांत्रिक प्रश्न सोडवणे.

अधिक माहितीसाठी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या (ABRSM) अधिकृत स्थानिक शाखेशी संपर्क साधावा.

यासाठी राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे विभागीय अध्यक्ष निखिल गायकवाड व डॉ राहुल माने यांनी सहकार्य केले. राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या शिवाजी विद्यापीठ विभागीय उपाध्यक्ष डॉ. चौगुले- निर्मळे यांनी पुढाकार घेऊन बी.एड. महाविद्यालयाच्या अनुदानासंदर्भातील मागणी व त्याबाबत आलेल्या सर्व समस्यांचा आढावा प्रमोद खेडकर यांच्यासमोर मांडला तसेच त्यांनी त्याबद्दल खेडकर सरांचे आभारही मानले. अशाप्रकारे सकारात्मक रीतीने ही चर्चा संपन्न झाली. संध्याकाळी चापोडीकर सर यांनीही खेडकर सरांची भेट घेतली व अनुदाना संदर्भात चर्चा केली.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!