पुणे पालिकेचा कारभार की मोगलाईचा अवतार? २०० वर्षे जुन्या ऐतिहासिक दर्ग्यावर मध्यरात्री चालवला हातोडा!


 राहुल डंबाळे आणि अंजूम इनामदार यांचा आयुक्तांना घेराव; कायदेशीर पुरावे असतानाही दमनशाही कारवाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ जेलमध्ये टाकण्याची ‘नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी’ची खडखडीत मागणी

पुणे : शिवछत्रपतींच्या पुण्यात आज पुन्हा एकदा कायद्याचा आणि लोकशाहीचा निर्घृण खून पडला आहे! ज्या पुणे महानगरपालिकेला दिवसाढवळ्या शहरातील रस्ते नीट करता येत नाहीत, ज्यांना पाणीबाणी सोडवता येत नाही, त्याच पालिकेच्या शूरवीर अधिकाऱ्यांनी बोपोडी येथील तब्बल २०० वर्षे जुन्या ‘हजरत शम्सुद्दीन कादरी’ दर्ग्यावर मध्यरात्रीच्या काळोखात भ्याडपणे बुलडोझर चालवला! या मोगलाई आणि दमनशाही कारवाईच्या निषेधार्थ आज अवघ्या पुण्यात संतापाचा ज्वालामुखी फाटला असून, ‘नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी’च्या वतीने पालिकेचे थेट वाभाडे काढण्यात आले आहेत.

संगठना प्रमुख राहुल डंबाळे आणि अंजूम इनामदार यांच्या संयुक्त नेतृत्वाखालील एका आक्रमक उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज थेट पालिका आयुक्त व प्रशासक, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांची भेट घेऊन त्यांना फैलावर घेतले. “स्वतःच्याच नियमांना केराची टोपली दाखवणारी ही पालिका आहे की एखादी गँग?” असा संतप्त सवाल विचारत नेत्यांनी आयुक्तांना तीव्र निषेधाचे निवेदन सादर केले, तर दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी खडकी पोलीस ठाण्यात थेट कायदेशीर तक्रार ठोकली आहे!

हा दर्गा म्हणजे कोणतेही रात्रीतून उगवलेले अनधिकृत अतिक्रमण नव्हते. पण डोळस पालिकेला अंधत्व आले असावे! खुद्द पुणे मनपाच्याच ११ मार्च २०१६ च्या अधिकृत जाहीर प्रकटनात (अनुक्रमणिका क्र. ४) या ऐतिहासिक दर्ग्याची नोंद आहे. ‘द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट, १९५०’ (स्कीम १३-३-१९८७) नुसार हा दर्गा रीतसर नोंदणीकृत आहे. अगदी १९३६ च्या ‘बुर्जुगानेदीन पुणे’ या ऐतिहासिक ग्रंथातही याचा उल्लेख आढळतो. सिटी सर्वे उतारा, लाईट बिल, पॅन कार्ड अशी सर्व कायदेशीर कागदपत्रे छातीवर मारण्यासारखी असतानाही, रात्रीच्या अंधारात चोरासारखी कारवाई करण्याचे पाप प्रशासनाने का केले? हा थेट कायद्याचा अवमान असून सर्वधर्मीय श्रद्धा असणाऱ्या या वास्तूवर हातोडा मारून पालिकेने पुणेकरांच्या भावनांशी क्रूर खेळ मांडला आहे.

निवेदन सादर करताना राहुल डंबाळे आणि अंजूम इनामदार यांनी पालिकेच्या पक्षपाती कारभारावर जोरदार हल्ला चढवला. “गेल्या काही काळापासून पुणे पालिका केवळ अल्पसंख्याक समाजाच्या मशीद, दर्गाह आणि मदरसा यांनाच आकसाने आणि सूडबुद्धीने लक्ष्य करत आहे का? शहरातील सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडवण्याचा हा विडा पालिकेने उचलला आहे का?” असा थेट आणि धारदार सवाल शिष्टमंडळाने विचारला आहे.

या निवेदनात शिष्टमंडळाने पालिकेसमोर तीन मुख्य आणि आग्रही मागण्या ठेवल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे, पुणे शहरातील सर्वच धर्मीयांच्या अधिकृत आणि अनधिकृत धार्मिक स्थळांचे तातडीने सर्वेक्षण करून ती यादी पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करावी, जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल! दुसरी मागणी, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना केवळ एका विशिष्ट समाजाला लक्ष्य न करता, संपूर्ण शहरातील अशा सर्व बांधकामांवर समान न्याय लावण्यासाठी पालिकेने आपला कालबद्ध कार्यक्रम (Time-bound Action Plan) त्वरित जाहीर करावा. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे, चॅरिटी कमिशनरच्या रेकॉर्डवर असलेल्या ऐतिहासिक दर्ग्यावर बेकायदेशीरपणे हातोडा चालवून धार्मिक भावना दुखावणारे आणि शहरात तणाव निर्माण करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे (FIR) दाखल करण्यात यावेत.

या बेकायदेशीर कारवाईमुळे मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावनांना तीव्र ठेच पोहोचली असून हा शहरात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा कट आहे, असा संशय व्यक्त करत शिष्टमंडळाने खडकी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि दोषींवर ‘BNS’ कलमांनुसार धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

“जर प्रशासनाने आणि पोलिसांनी या गुन्हेगार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई केली नाही, तर ‘नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी’ संपूर्ण पुणे शहरातील शांतताप्रिय, पुरोगामी आणि लोकशाहीवादी जनतेला रस्त्यावर उतरवून तीव्र सनदशीर मार्गाने आंदोलन छेडेल! मग होणाऱ्या परिणामांना हेच आंधळे प्रशासन जबाबدار असेल!” असा खणखणीत इशारा अंजूम इनामदार आणि राहुल डंबाळे यांनी दिला आहे.

या आक्रमक शिष्टमंडळात हजरत शम्सुद्दीन दर्गा ट्रस्टचे आरिफ पिरजादे, मुनाफ शेख, इफ्तेकार पिरजादे, सादिक शेख, गफ्फार तुर्क, मुनव्वर कुरैशी, अहमद सय्यद, उस्मान तांबोळी यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालिकेच्या या कृत्याचा निषेध आता पुण्याच्या गल्लीबोळातून व्यक्त होत आहे.

 

#PuneMunicipalCorporation #BopodiDargah #DemolitionProtest #NationalConferenceForMinority #RahulDambale #AnjumInamdar #JusticeForBopodiDargah #PuneNews #PressMediaLive #SocialJustice #AdministrativeHighhandedness #SaveHeritage


कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

42
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!