पुणे झेडपीचा मोठा निर्णय: बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे बदली घेणाऱ्या शिक्षकांची होणार उचलबांगडी


पुणे झेडपीचा मोठा निर्णय: बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे बदली घेणाऱ्या शिक्षकांची होणार उचलबांगडी

पुणे: पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली प्रक्रियेत दिव्यांग प्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले असून, प्रशासनाने आता कठोर पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी दोषी आढळलेल्या ३८ शिक्षकांची तातडीने बदली करण्यात येणार असून त्यांच्यावर विभागीय चौकशीची टांगती तलवार आहे.

नेमके प्रकरण काय? जिल्ह्यात बदलीसाठी ४०० हून अधिक शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्रांचा लाभ घेतल्याची तक्रार दिव्यांग संघटनांनी केली होती. या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी १७६ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची आरोग्य उपसंचालकांमार्फत फेरपडताळणी केली. या तपासणीत अनेक शिक्षकांचे अपंगत्व ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे समोर आले.

३८ शिक्षकांची कबुली या संदर्भात ४६ शिक्षकांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यापैकी ३८ शिक्षकांनी आपण बदलीसाठी या प्रमाणपत्रांचा लाभ घेतल्याची कबुली दिली आहे. यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रशासकीय कारवाई जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी स्पष्ट केले की, “ज्या शिक्षकांनी बदलीसाठी दिव्यांग प्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाले आहे, त्यांची तत्काळ बदली केली जाईल. तसेच, या सर्व शिक्षकांविरोधात कडक विभागीय चौकशीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल.”

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!