प्रेरणा शिबीर द्वारे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या सत्राची सुरवात.


प्रेरणा शिबीर द्वारे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या सत्राची सुरवात.

इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चा दुसर्या सत्राची शुरवात एका भव्य आणि उत्साहाच्या वातावरणात करण्यात आली . महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील मॅडम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि श्री. कासार साहेब यांच्या प्रेरणेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे शिक्षकवर्गात नवीन ऊर्जा आणि उत्साहाचा संचार झाला.

श्री. बी एम कासार शिक्षणाधिकारी मनपा इचलकरंजी यांचे प्रेरणादायी आवाहन, कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले त्यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांना नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. त्यांच्या विचारांमधील सकारात्मकता आणि दूरदृष्टी यामुळे संपूर्ण शिक्षकवर्गात नवी उमेद निर्माण झाली.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. सचिन देसाई(राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक) यांनी आपले अनुभवसमृद्ध आणि उद्बोधनपर मार्गदर्शन शिक्षकांना केले. त्यांनी आधुनिक शिक्षणपद्धती, अध्यापनातील नव्या कल्पना आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षकांमध्ये एक नवे चैतन्य आणि प्रेरणा संचारली.या कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन आणि यशस्वी आयोजनासाठी महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी श्री. इरफान पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला, ज्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमा मध्ये इचलकरंजी मनपा शाळेतील एकूण २६० शिक्षक ,मुख्याध्यापक व केंद परीवेक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर परीवेक्षक राजेंद्र घोडके, केंद्रमुख्याध्यापक अदीप पाटील, सौ सुवर्ण जंगम, सौ. सविता माळी, सौ. गोर्वे मॅडम आणि श्री. आंबेकर सर व दिलीप माने यांनी मोलाचे योगदान दिले.कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या या महत्त्वपूर्ण कार्याचे कौतुक केले. तसेच, सर्वांना शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करण्यात आले. सर्व उपस्थितांनी माननीय पाहुण्यांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानून या उत्साहवर्धक कार्यक्रमाचा समारोप झाले

शिक्षण विभाग   इचलकरंजी महानगरपालिका


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!