नेत्रदीप रोषणाईने सजवलेल्या रथ, ढोल ताशा बॅण्ड बाजा पथकासह देहूरोड शहर गेले दुमदुमून

देहूरोड दि. :- संविधान सन्मान संघाचा वतीने “संविधान दिवस अमृत महोत्सव देहूरोड येथे भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला ढोलताशांच्या निनादात शहर गेले दुमदुमून संविधान सन्मान संघच्या वतीने सकाळी सर्व प्रथम सकाळी दहा वाजता देहुरोडच्या जनरल हॉस्पिटल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मनोनित सदस्य ॶॅड. कैलास पानसरे व भाजपा शहराध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जयघोष करत संविधान दिवस चिरायू होवो संविधान सन्मान संघच्या विजय असो असे गगनभेदी घोषणा दिल्या या वेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांनी सोबत उभे राहून प्रस्ताविकाचे एका मुखाने वाचन केले व समता बंधुता अखंडतेचे शपथ घेतली .

यावेळी ॶॅड. पानसरे यांनी शाळेय विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व सांगितले व आलेल्या विद्यार्थ्यांना संविधानाचे लिहिले घटना सांगितले उपस्थित लोकांना संबोधित करताना म्हणाले ज्या संविधानावर देश चालतो,आम्हाला तुम्हाला प्रत्येकाला संविधानामुळे एक सारखा न्याय मिळतो प्रत्येकाला एक मतदानाचा अधिकार या बाबासाहेबांनी दिला आहे कोण काही बोलो संविधान बदलण्याची ताकत कोणा मध्ये नाही जो पर्यंत देश आहे तो पर्यंत संविधान आहे असे उपस्थितांना संबोधित केले
यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ पाणी वाटप करण्यात आले यावेळी शाळेय शिक्षक पैगंबर पठाण बाबाजी सतू हे उपस्थित होते तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीनिवास चाटे सह संविधान सन्मान संघाच्या वतीने रुग्णांना फळे व बिस्कुट वाटप करण्यात आले. तर सकाळी अकरा वाजता साईनगर मामुर्डी येथे संविधान सन्मान संघांचे नुतन कार्यालयांचे उद्घाटनाचे जेष्ठ नेते रमेश जाधव यांनी श्रीफळ फोडून फित कापुन कार्यालयांचे उद्घाटन केले यावेळी अध्यक्ष डॉ रामदास ताटे, मोझेस दास, श्रीमंत शिवशरण, चंद्रशेखर पात्रे, एम डी चौधरी, हिरामण साळुंके, संजय आगळे, राहुल गायकवाड आदि उपस्थित होते. सायंकाळी चार वाजता कार्यक्रमाच्या स्थळी डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान फलकास हार अर्पण करून फुलांचे सजावट करण्यात आले .
कार्यक्रमाच्या ठिकाणी मंचावर एकता महिला संघ व बोधीसत्व जनजागृती संघाचे अध्यक्षा संगिता अशोक वाघमारे, जिनत शेख यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास धुपदिप अगरबत्ती लावून पुष्पहार अर्पण केले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पा संजय कांबळे यांनी हार अर्पण केले. यावेळी श्री शिवाजी विद्यालय येथील विद्यार्थी विद्यार्थिनी उभे राहून उदेशिकाचे वाचन केले प्रत्येक मुलांना प्रस्ताविक वाचन तोंड पाठ असल्याने उपस्थित लोकांनी मुलांचे तोंड भरून कौतुक केले व भारत माता कि जय संविधान दिनाचा विजय असो संविधान दिवस चिरायू होवो अशी जोरदार घोषणाबाजी परिसर दणाणून सोडले यावेळी शाळेय मुलांना खाऊ पाणी वाटप करण्यात आले .
सायंकाळी साडे सहा दरम्यान संविधान सन्मान संघच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात दोन ढोल लेझीम व बॅण्ड बाजा पथकासह रॅली काढण्यात आले एका रथा मध्ये डॉ बाबासाहेबांचे भव्य पुतळा व संविधान उदेशिका ठेवण्यात आले तर दुसऱ्या एका रथा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा ठेवण्यात आले होते दोन्ही रथाना नेत्रदीपक रोशनाई करण्यात आले होते नेत्रदीप रोषणाईने बघण्याची लोकांनी खुप मोठी गर्दी केली होती ही रॅली मुंबई पुणे महामार्गाने निघून देहूरोड अंकित पोलीस चौकी (सवाना उपहारगृह) येथे ढोल ताशा पथकाने आपले जोरदार प्रदर्शन करत पुढे पारशीचाळ, वृंदावन चौक चौक येथे ढोल लेझीम पथकाने परत एकदा संपूर्ण परिसर दणाणून सोडले तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार घोषणाबाजी केली.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधान दिनाचा विजय असो, संविधान दिवस चिरायू होवो अशी जोरदार घोषणाबाजी केली ही रॅली पुढे महात्मा फुले मंडई येथे ढोल ताशा पथकाने परत एकदा जोरदार प्रदर्शन केले पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे येताच बॅण्ड बाजा पथकासह ढोल ताशा पथकाने संपूर्ण बाजारपेठ दणाणून सोडले पुढे ही रॅली गुरूद्वारा येथुन परत स्वामी विवेकानंद चौक येथे याची सांगता झाली. यावेळी ॶॅड गोरखनाथ लोखंडे यांनी उपस्थित लोकांना संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान कशा प्रकारे लिहले या संविधानात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वाना एका सुत्रात बांधून सर्वांना न्याय बंधुता लोकशाही ची रचना कशी केली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले आहे ते कोणी बदलू शकत नाही परिस्थिती प्रमाणे कलमात वाढ होऊ शकते पण घटना कोणी बदलू शकत नाही असे महत्वाची माहिती उपस्थितांना दिली.
संविधान सन्मान संघच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत संयोजन समितीचे अध्यक्ष मोझेस दास व कार्यकारिणी सदस्यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले. संविधान सन्मान संघच्या वतीने जाहीर पुरस्कार वितरण करण्यात आले आयोजकांच्या वतीने नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर अगरवाल, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मा. उपाध्यक्ष मदन सोनिगरा, गुरूद्वारा समिती चे अध्यक्ष गुरुमितसिंग रत्तू, सामाजिक कार्यकर्ता संजय शेंडे, प्राॅफेसर इंजिनिअर करण ताटे यांचे शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपा शहराध्यक्ष रघुवीर शेलार, इंद्रपालसिंग रत्तू, कैलास गोरवे, रेणू रेड्डी आनंद साळवी, सचिन भुंबक, राजेश मांढरे, मलिक शेख, जावेद शेख, गफुरभाई शेख, धनंजय मोरे, विलास हिनकुले, ॶॅड कृष्णा दाभोळे, सुरेश गायकवाड, सुनिल गायकवाड, विजय लोखंडे आदि मान्यवर उपस्थित होते.या भव्यदिव्य रॅलीत मदन सोनगिरा गुरुमितसिंग रत्तू ,ईश्वर अगरवाल, सह विलास हिनकुले, सुरेश गायकवाड, अरविंद गायकवाड, ईरप्पा तेलगु, अशोक चव्हाण, रविंद्र कदम, अंकुश धावारे, चंद्रकांत गायकवाड, शिवाजी दाभोळे, करीम शेख, शामराव गायकवाड, राहुल गायकवाड, संजय कांबळे, उत्तम अलकोंडे, करण ताटे, संगिता वाघमारे, जिनत शेख, सुनिता मंगवानी, सुनिता ठाकुर, पुष्पा संजय कांबळे, शिल्पा शेंडे, राजश्री टेंबुरकर, पुष्पा सोनवणे शहरातील अनेक नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.संजय आगळे, एम डी चौधरी, राजाराम अस्वरे अध्यक्ष डॉ रामदास ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव कमिटीचे अध्यक्ष मोझेस दास श्रीमंत शिवशरण चंद्रशेखर पात्रे बाबु हिरमेठकर विजय पवार यांनी परिश्रम घेतले.कुठले ही अनुचित प्रकार घडू नये या साठी देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी पोलीस वाहनसह पोलीस कर्मी महिला पोलीस कर्मचारी याचा मोठा ताफा सह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटीला नेहमी सहयोग दर्शविणारे नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम झाला.































