मोदीजींच्या ‘काटकसरी’चा नगरसेवकांना विसर ? वसंत मोरेंनी काढली भाजपच्या ‘शाही’ थाटाची वरात !


मोदीजींच्या ‘काटकसरी’चा नगरसेवकांना विसर ? वसंत मोरेंनी काढली भाजपच्या ‘शाही’ थाटाची वरात !

पुणे : देशातील नागरिकांनी काटकसर करावी आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने करत आहेत. मात्र, पुण्यात भाजपचे नगरसेवकच पंतप्रधानांच्या या आवाहनाला ‘केराची टोपली’ दाखवत असल्याचा आरोप करत वसंत मोरे यांनी महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले. “नको आम्हाला मन की बात, करो सिर्फ काम की बात” अशा घोषणा देत मोरेंनी सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी धोरणावर नेमके बोट ठेवले.

       आंदोलनातील काही बोलकी क्षणचित्रे:

आलिशान गाड्यांची ‘परेड’: महापालिकेच्या पार्किंगमध्ये एकामागोमाग एक येणाऱ्या भाजप नगरसेवकांच्या आलिशान गाड्यांकडे बोट दाखवत वसंत मोरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारले, “बघा, हेच का ते मोदीजींचे काटकसरी नागरिक?” हे पाहताच काही नगरसेवकांनी आपली गाडी प्रवेशद्वारावर न थांबवता थेट आत नेणे पसंत केले.

कार पूलिंग’चा विसर: भाजपचे चार-चार नगरसेवक एकाच प्रभागातून वेगवेगळ्या गाड्यांतून पालिकेत येतात, हे पाहून मोरेंनी उपरोधिकपणे टाळ्या वाजवल्या. “एकाच गाडीत बसून आलात तर तुमची प्रतिष्ठा कमी होईल का? इंधन वाचवा आणि लोकांसमोर आदर्श ठेवा,” असा टोला त्यांनी लगावला.

रिकाम्या खिशा’चा आक्रोश: आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचे फलक हातात धरले होते. “जनतेच्या खिशात बसचे तिकीट काढायला पैसे नाहीत आणि नगरसेवक मात्र सरकारी खर्चाच्या थाटात मिरवत आहेत,” असा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला.

सत्ताधाऱ्यांची ‘बोलती बंद’: वसंत मोरेंचा आक्रमक पवित्रा आणि त्यांचे थेट सवाल ऐकून महापालिकेत जाणारे अनेक पदाधिकारी उत्तरे देण्याचे टाळून मान खाली घालून निघून जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

वाढती महागाई आणि वाहतूक कोंडीच्या मुद्यावरून वसंत मोरेंनी आज सत्ताधाऱ्यांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. पंतप्रधानांचा सल्ला फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का, असा खडा सवाल या आंदोलनाद्वारे विचारण्यात आला.


कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

42
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!